गेले काही दिवस मला पट्टाकिनी आमच्या घराशेजारच्या देवळात जावसं वाटतंय तिथल्या एका गुरुजींना भेटायला, नमस्कार करायला, त्यांचे आशीर्वाद घ्यायला. पण तरी कोणीतरी, काहीतरी मला थांबवतय, असं मला वाटतंय, का कुणास ठाऊक. असो. तर त्याचं असं झालं कि गेले १०-१५ वर्ष माझ्या आठवणीपणाने दररोज न चुकता सकाळी आणि संध्याकाळी ८ वाजता आमच्या अगदी जवळ असलेल्या श्री सोमेश्वर देवस्थानात आरती होते, मोठ्याने, स्पष्ट, सुमधुर आवाजात आणि सर्वांच्या कानावर पडावी ह्या करता लाऊड स्पिकर वर. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मी तरी आजतागायत फक्त आणि फक्त एकाच गुरुजींच्या सुस्वरात ती आरती ऐकली आहे. केवढा मोठा आशीर्वाद आहे गुरुजींना हा, श्री. सोमेश्वरचा. केवढी मोठी सेवा सातत्याने घडते आहे त्यांच्या कडून, त्यांच्या हातून, त्यांच्या स्वरातून, अहाहा, मी तर निःशब्दच झाले जेव्हा मला हे जाणवलं तेव्हा. आशीर्वाद, किंबहुना भरभरून आशिष म्हणजे अजून काय हो, ह्या पल्याड काहीच नाही माझ्या साठी तरी, किंवा हा एक दृष्टिकोन आहेच नक्की. इतकी वर्ष, अगदी तो च स्वर, तेच स्पष्ट उच्चार, शांतते, गतीत, घाई गडबड नाहीच, ताल-लय सर्व सांभाळून श्रवणीय सादरीकरण घडणं म्हणजे फारच कौतुकास्पद. सुसंगती, सातत्य आणि आशीर्वाद ह्यांचं उत्कृष्ट उदाहरण आहे माझ्या दृष्टीने हे. ज्यांच्या कानावर हे स्वर पडतात दररोज त्यामुळे कित्येकजण बरे झाले असतील, औषध कामी आली असतील, बाळांची वाढ उत्तम झाली असेल, शाळकरी मुलांचा अभ्यास लक्षपूर्वक होण्यास कारणीभूत ठरले असतील आणि हे सर्व नकळत बरं का, अशी अनेक अजून यादी देता येईल. चार पायांचे आपले मित्र, पशु पक्षी सर्वानांच ह्याचा निश्चित लाभ झाल्याशिवाय राहणार नाही हे त्रिवार सत्य.
त्या गुरुजींच्या हस्ते अशी सेवा अजून अनेक वर्ष घडो हि ईशचरणी मनःपूर्वक प्रार्थना.
असं म्हणतात कि जे कैलाश मानसरोवर, चारधाम, नर्मदा परिक्रमा आणि अश्या यात्रा करून आले आहेत त्यांचे चरणस्पर्श करावे, त्यांच्या सानिध्यात राहावं, काही अंशी नकळत पुण्य पदरी पडत. अगदी तसेच ह्या गुरुजींच्या पायावर डोकं टेकवावं असं मनात आलंय, बघूया कधी पुण्य पदरात पाडून घेण्याची वेळ येते ते? हे जाऊन त्या गुरुजींना सांगावं का, त्यांना कळेल का, त्यांना आधीच हे माहित असेल का, त्यांना ह्याच महत्व समजेल का, असे बरेच प्रश्न आलेत मनात, म्हटलं लिहावं आधी, अर्थात लिहून घेणारा देखील तोच, मी फक्त माध्यम.
बुधवार, १६ मार्च, २०२२
सुसंगतता, सातत्य आणि आशीर्वाद
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा