१९९५ सालापासून माझ्या आजूबाजूला सतत तरुणांचाच वावर आहे. माझे सगळे विद्यार्थी आणि आमच्याच आजुबाजुच्या विविध संस्थांचे देखील भरमसाठ तरुण तरुणी. अहाहा, माहोल असतो नेहेमी. आज होलिका मातेचं पुजन, अशी एक प्रचलित म्हण आहे कि "होळी आली आणि थंडी पळाली". ह्या प्रमाणे अजूनही हवेत किंचित गारवा आहेच, सकाळी, पहाटे, संध्याकाळी, रात्री प्रसन्न वाटतं, आणि हो आमच्या पुण्याची ती खासियत आहेच, संध्याकाळ झाली कि आपोआप किंचित शांत आणि गार जाणवतच. पण तरी देखील सर्वत्र अचानक मला माझ्या चार डोंळ्यान्नी काही तरी वेगळं हेरलं. बहुतांशी सगळेच ऑफ शोल्डर टॉप्स घालायला लागले, स्लिव्हलेस परिधान करायला लागले, हलके रंग नजरेस पडले, पातळ सुती कपडे दृष्टीस पडले आणि लक्षात आलं कि अच्छा चाहूल लागली तर उन्हाळ्याची. पण फक्त एवढाच बदल पुरेसा आहे कि खरं च एवढी गरमी आहे, का फक्त बाहेरची फॅशन केली कि झालं, तोकडे कपडे घातले म्हणजे गर्मी होत नाही का? बघायला पाहिजे एकदा अनुभव घेऊन,मला तरी नाही वाटत. मागे एकदा लिहिल्याप्रमाणे शारीरिक, मानसिक उष्णतेकडे कोण लक्ष देणार? आणि त्यासाठी प्रचंड बर्फ घातलेला मिल्कशेक हा तरणोपाय नाहीच, किंवा प्लास्टिक बाटलीतले शीतपेय जे कधी काळी पॅक केले असतात, मग ते कुठेही उन्हात तान्हात पहुडलेले असतात. काही काळ मग फ्रिज मधे ठेवून विकले जातात. प्रत्येकाच्या घरी एक आरसा असतो, किंवा येता - जाता गाडीच्या काचेत, आणि बऱ्याच ठिकाणी स्वतःला बघता येतं. फक्त फॅशन च्या आहारी जाणं योग्य नाही, स्वतःला काय शोभून दिसतं, दुसऱ्याने घातलं म्हणून आपण पण घालायचं का? गरज आहे का? ई. विचार करा मंडळी, आंतरिक शांततेकडे देखील थोडसं लक्ष्य द्या म्हणजे सर्वत्र गारेगार भासेल नेहेमीच. फक्त डोळ्यावर काळा चष्मा, ऑफ शोल्डर टॉप, सतत डोक्यावर प्रचंड स्पीड चा पंखा, AC आणि सतत ई. मुळे थंड वाटलं असतं तर कित्ती सोप्प झालं असतं नाही. टोपी किंवा रुमाल, साधं पाणी माठातलं जास्तीत जास्त, ताक, पन्ह, लिंबूपाणी, "साधी राहणी उच्च विचारसरणी" इतकं पुरेसं आहे उन्हाळा आनंदाने उपभोगायला. करा हवी तेवढी फॅशन करा, पण वेळ, प्रसंग, ठिकाण पाहूनच. कॉलेज आणि ऑफिस मधे एका विशिष्ठ पद्धतीने येणं योग्य. उन्हाळा आला आहे हे असं दाखवायची गरज नक्कीच नाही.
गुरुवार, १७ मार्च, २०२२
उन्हाळ्याची चाहूल
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा