गुरुवार, १७ मार्च, २०२२

भूमीपूजन किटाणू रिलोकेट

मोठ्या मोठाल्या शहरात पोटासाठी, कामासाठी, शिक्षणासाठी किंवा अजून काही कारणास्तव अनेक जण विविध गावातून, शहरातून वास्तव्य करायला येतात. मग साहजिकच वाढत्या लोकसंख्येची गरज भागवण्याकरता रहिवासी ठिकाणं, प्रकल्प, घरं ई. बांधली जातात, त्या मोठ्या शहराचं रूपांतर आणखीन मोठ्या विस्तारित शहरात होत. असो, कालाय तस्मै नमः. नवीन गरज, नवीन प्रकल्प म्हणजे अर्थातच भारतात सुरवात नेहमी पुजेने होते, भूमिपुजनाने, शास्त्र म्हणून कुदळ वापरली जाते, चांगल्या मुहूर्तावर. माझ्या दृष्टीने तिन्ही लोकात जीवसृष्टी आहे, भुतलावर, खाली आणि वर देखील. जमिनीच्या खाली असंख्य पद्धतीचे, प्रकारचे, आकाराचे जीव, जंतू, किटाणू, छोटे सरपटणारे प्राणी, ई. राहतात त्यांच्या कुटुंबीयांसोबत, मित्रपरिवारासोबत अत्यानंदाने आणि सहसा कुणालाही त्रास न देता. किंबहुना सरपटणारे प्राणी तर शेतकऱ्यांचे मित्र असतात. प्रगतीच्या नावाखाली आपण माणसं मात्र कदाचित वसाहत नष्ट करतो. म्हणूनच भूमीपूजनाच्या वेळी, वास्तुच्या मंत्रांमधे त्या जमिनीखालच्या जीवांसाठी क्षमा मागितली असते नेहेमी. मला सहज एक विचार मनात आला कि जेव्हा अगदी सुरवातीला नवीन प्रकल्प चर्चिला जातो एखाद्या जागेत तेव्हा पासून ते पहिली कुदळ ते भूमिपूजन ह्या दरम्यानच ते भूमिगत जीव स्थलांतरित होत असतील हळू हळू, जमेल तसे जमेल तेव्हा जमेल तेथे. त्यांना भनक नक्कीच लागत असेल, जाणवत असेल कि काही तरी वेगळं होतंय किंवा होणार आहे लवकरच. त्यामुळे वस्ती हलवणं हितावह. ते रडत बसत नाहीत मार्ग काढतात. रडणार तरी कोणासमोर, किती आणि का? तीच ऊर्जा, तोच वेळ जर स्थलांतर करण्यास वापरला तर? आणि अगदी तेच ते करतात. मोठ्या मोठ्या इमारत बांधण्याच्या मशीन समोर त्यांचा जीव तो केवढा, टिकाव कदाचित लागणार नाही आणि इमारत बांधणाऱ्याला त्याच काही घेणं देणं नाही. स्थलांतरीत होतांना कष्ट तर होतातच, पण एक वेगळा आनंद पण देऊन जातो, नवीन ठिकाण, नवीन मैत्र, आणि वातावरण सुद्धा. चला तर मग ह्या सर्व जीवाणूंकडून बोध घेऊया आणि अमलात आणू या जेव्हा हवं तेव्हा. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...