होलिका पुजनाच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना.
होळी आली थंडी पाळली हे अगदी खरं आहे. माझ्या मते सध्या आंब्याचा मोहोर अगदी बहरात आलेला असेल बहुतेक ठिकाणी. ह्या असंख्य ठिकाणी प्रज्वलित होणाऱ्या होळी मुळे क्रतु बदलत तय्यार झालेले उपद्रवी किटाणू नष्ट व्हायला मदत होत असेल न कळत, मोहोर अधिक बहरात येत असेल, वातावरण शुद्धी होत असावी आणि बरीच अशी वैज्ञानिक कारणं नक्की देता येतील.
मानसिक स्तरावर देखील असं म्हणतात कि होलिका मातेला सर्व राग, लोभ, मोह आणि नको ते उपद्रवी मनातले जिन्नस अर्पण करा म्हणजे पुढे अख्ख वर्ष आनंदात जाईल ह्यात शंकाच नाही. ते अर्पण करण्याकरता पूजा करा, प्रदक्षिणा घाला, एकरूप व्हा आणि त्या निमित्याने शेजार पाजाऱ्यांशी संवाद साधा, घरच्या कुटुंबीयां सोबत वेळ व्यतीत करा आणि फरक अनुभवा.
माझे आजी आजोबा, मग आई बाबा घरीच अंगणात गोवऱ्या आणून, कोळसे लागले तर वापरून, काठ्या, विटा आणि इतर साहित्य घेऊन होळी ची पूजा करत असतं. मग ती धग वापरून त्यावर पाण्याचं पातेलं नारंगी रंगाच्या फुलांनी भरलेलं ठेवायचे. रात्रभर त्या छोटेखानी धग वापरून त्याचा सुरेख रंग तय्यार व्हायचं नैसर्गिक रित्या आणि मग त्याने रंगपंचमी खेळायची. आठवणी फार अप्रतिम आणि गुळापेक्षा गोड देखील. त्यामुळे आज मी सर्वांना
- अगदी भरभरून चिंब शुभेच्छा देते, सर्वांसोबत भरपूर आणि सांभाळून रंग खेळा, वेळ घालवा
- डोंगराएवढ्या गोड शुभेच्छा पण, पोटभर पुरणपोळी फस्त करा
- रंगबिरंगी शुभेच्छा देखील, वर्षभर पुरणाऱ्या, इंद्रधनुषी आनंद, स्वास्थ्य देणाऱ्या अश्या
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा