रविवार, २० मार्च, २०२२

गाडीचा ब्रेक

माझ्या दृष्टीने सध्या वय पण आहे आणि गरज त्यामुळे माझ्या लेकीने पट्टाकिनी ड्रायव्हिन्ग शिकणे आवश्यक आहे असं मला वाटतं. ती शिकेल देखील पट्टाकिनी. आजकालची पिढी चुणचुणीत आहेच, सिम्युलेटर्स आहेत आणि नव्या कोऱ्या गाड्यांवर शिकायची मज्जा, उत्साह काही वेगळाच असणार. नवीन गाड्या म्हणजे सर्व सोयींनी युक्त, नवीन तंत्रज्ञान आणि कोरकरकरीत सगळं. सळसळत्या रक्ताला अशी गाडी मिळाली कि मग काय सोन्याहून पिवळं, शिकणारचं कि पट्टकन.

आताच नाही खूप वर्षांपासून माझं एक निरीक्षण माझ्यापुरतं झालंय जे मी माझ्या मुलांना तेव्हा देखील सांगितलं आणि आता देखील सांगते. ते असं कि आपण ज्यांनी स्व कष्टाने चारचाकी विकत घेतली आहे ते व्यवस्थित गतीने सांभाळून चालवतात गाडी, नेहेमीच. अंगात आल्यासारखी गाडी चालवतांना एखादा आढळला रस्त्यावर म्हणजे ती गाडी त्याची नाही हे निश्चित, कोणाची तरी फुकट चालवायला मिळाली आहे, मस्ती आहे. असो. तर आपली गाडी चालवतांना कचकन ब्रेक दाबण्याची गरज सहसा येत नाहीच. आणि स्पीड कमी केली कि अप्रत्यक्ष ब्रेक दाबल्यासारखंच, नाही का? हळुवार ब्रेक दाबला कि गती कमी होते आणि प्रवेगक / वेगवर्धक / ऍक्सिलरेटर सोडला कि देखील तसाच परिणाम साधता येतो.

सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या वाहनाशी मैत्री करा, संवाद साधा, धन्यवाद द्या, प्रेम करा, तिला प्रेमाने हाताळा आणि मग बघा ती तुमच्यावर कशी भरभरून प्रेम करते ते, तुमची काळजी घेते ते, तुम्हाला आनंद देते ते. "गिव्ह अँड टेक" बास.

चला तर मग मंडळी आता मी आज सुंदर स्वप्न बघायला मोकळी झाले, माझ्या लेकीशेजारी बसून गाडीत धम्माल लवकरच करणार मी. मला जाणवलेली सगळी माहिती मी कानावर घातली आहे, ती तिच्या पद्धतीने चालवेल आणि रस्त्यावर नक्की राज करेल ह्याची खात्री आहेच.

अगदी असेच नेहेमीच, फक्त गाडी चालवतांनाच नाही तर ऑफिस मधे कामं करतांना, नात्यांमधे, दररोज च्या व्यवहारात ई. देखील हळुवार जाऊ द्या गाडी, कचकन ब्रेक दाबायची वेळ नको यायला, आणि अधेमधे स्पीड कमी-जास्त करत आनंदाची सफर घडू दे, सर्वांना.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...