शनिवार, १९ मार्च, २०२२

संसार म्हणजे आणा

मला स्पष्ट आठवतंय कि माझी मुलं शाळकरी झाल्यापासून जरा समीकरणं बदलली, सगळीच. त्यात सगळ्यात मोठा बदल मला जाणवलेला म्हणजे न चुकता दररोज दुकानाचं दर्शन. त्यामुळे माझी आई म्हणायची ते फारच पटलं आणि पटतंय मला "संसार म्हणजे रोज आणा, काहींना काही तरी लागतंच". माझी स्वतःची रोजनिशी सांगते, सोमवार - गुरवार हार, मंगळवार - शुक्रवार फळं, बुधवार - शनिवार कधी भाजी / किराणा / ब्रेड ई. आणि त्या व्यतिरिक्त पेन, वही, रंग, चॉकलेट हे तर ते. देवा. हे सगळं रविवारी आठवड्याभरची भाजी आणि महिन्याभरचं सामान आणलेलं असल्यावर सुद्धा. ह्याचा अर्थ एक तर मला काहीतरी जमत नाही आहे किंवा गरजा वाढल्या आहेत, बदलल्या आहेत.  असो. हे सगळं होत असतांना मला नेहेमी एक विचार यायचा मनात आणि मी एक नेहेमी वाक्य उच्चारायचे ते असे "मी देवळात रोज जात नाही त्या बाप्पाचं दर्शन घ्यायला पण दुकानाचं दर्शन पक्क ठरलंय". पण मग मी त्यातूनही मार्ग काढला, सकाळी न चुकता बाप्पाचं दर्शन आणि संध्याकाळी दुकानाचं, भारी कि नाही.  

माझ्या स्वभावानुसार एखाद्यादिवशी जर काही आणायचं नसेल, ठरलेलं नसेल तर माझ्या चार डोळ्यांना नवीन काहीतरी दिसायचं, मुलांसाठी, घरच्यांसाठी काही तरी वेगळं घेऊन जावसं वाटायचं. त्यामुळे दररोज ची चक्कर ठरलेलीच कुठल्या ना कुठल्यातरी दुकानांची. सुपर शॉप्पी प्रकार मला लै भारी आवडतो. स्वःतचं स्वतः फार, हवं ते उचला, उत्कृष्ट रित्या सगळं मांडलं असत डोळ्यादेखत. 

थोडक्यात काय मज्जाच मज्जा, घर आहे, मुलं आहेत, शाळा आहे, खाण्याची प्रचंड आवड आहे म्हणजे हे सगळं आलंच, नाही का. आहे कि नाही अगदी सोप्पी परिभाषा संसाराची. संसार म्हणजे रोज आणाच.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...