शनिवार, १९ मार्च, २०२२

Virtual रिअल जत्रा

परंपरेनुसार दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील आमच्या सोमेश्वरवाडीत महाशिवरात्री दिवशी भली मोठी जत्रा भरली होती. दोनेक दिवस आधी दुकानांची मांडामांड, लगबग सुरु झाली होती. हे वर्ष खूपच खास होत जत्रेकरीता कारण प्रत्यक्ष जत्रेत खंड पडला होता, एक स्वल्पविराम, अल्पविराम होता. त्यामुळे सर्वांचाच उत्साह द्विगुणित झाला होता, त्या जत्रेतल्या दुकानदारांचा आणि भक्तांचा देखील, दोन वर्ष सलग थांबलेली जत्रा पुन्हा पूर्वपदावर आली होती. अहाहा.

माझी लेकरं लहान असतांना मी उत्साहात त्यांना घेऊन जायचे जत्रेला, आकाशपाळण्यात बसायला, काही खरेदी करायला ई. पण ह्या वर्षी दोन कारणांसाठी जाणं अवघड होत, एक म्हणजे अजूनही थोडीशी उरलेली भीती आणि माझे प्रिय पाय.  पायांना त्रास नको म्हणून मी घरच्या खिडकीतून, बालकनीतून जितकं दिसेल, ऐकू येईल तितकं एन्जॉय करत होते virtually. अश्या जत्रेबित्रेला जायचा प्रचंड उत्साह मलाच आहे, त्यामुळे माझी लेक घरीच होती, ती काही जाण्याच्या भानगडीत पडली नाही.

दुसऱ्या दिवशी मी ऑफिसाला थोडी लवकर निघाले काम होतं म्हणून. त्यामुळे माझी आमच्याकडे काम करणाऱ्या मावशींशी भेट झाली नाही. तिसऱ्यादिवशी मावशी आवर्जून संध्याकाळी आल्या मला भेटायला आणि माझ्या लेकीला आणि मला हळूच हातात खूप काही ठेवलं / कोंबलं म्हटलं चालेल कारण बऱ्याच गोष्टी होत्या. माझ्या लेकीला अंगठ्यांचा जगावेगळा शौक आहे त्यामुळे तिच्यासाठी अंगठ्या, मला वैविध्य कानातली मिरवायला आवडतात त्यामुळे माझ्या साठी ४-५ प्रकारची - आकाराची - रंगांची - धाटणीची कानातले जोड. आणि त्यावर म्हणतात कश्या "मला माहिती होतं तुम्हाला चालणं जमणार नाही पण आवडतं देखील जत्रेत जायला, म्हणून जत्राच घरी घेऊन आले".  "प्रेम म्हणजे अजून काय असतं", "सुख म्हणजे नक्की काय", काय गरज आहे खरं माझा एवढा विचार करण्याची, काटाच आला अक्षरशः अंगावर आणि डोळ्यात पाणी तरळलं ते वेगळंच. रक्ताचं नातं नाही पण हे तर त्यापेक्षाही वेगळं आणि पुढचं आढळलं मला. तर ह्या वर्षीची जत्रा मी अशी virtual पण really अनुभवली. पुढल्या वर्षी जातेच कि नाही ते बघाच आणि सर्वांसाठी खूप खरेदी करून आणते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...