आज एका नवीन गाण्याने माझा दिवस फारच अप्रतिम सुरु झाला. म्हणून त्याचा विडिओ / ते गाणं मी माझ्या मुलांना तर पाठवलंच पण मीदेखील अजून एक दोन तीनदा ऐकलंच, म्हणजे मी स्वतःला आवरूच नाही शकले. होतंच ते गाणं किंबहुना आहेच ते गाणं वेगळं. का? सांगते ऐका. अहो त्यात आधी एक कडवं सुरु झालं, मग दुसरं आणि विडिओ च्या टाईमिंग्स वरून फार मोठं आहे गाणं असं वाटलं, नीट कान देऊन ऐकलं तर काय ज्या ओळीने गाण्याचे पहिले तीन कडवे रेकॉर्ड केले, त्याच्या उलटे त्यानंतर म्हटले आहेत आणि पहिल्या कडव्यानी शेवट केलाय, म्हणून ते भलं मोठं वाटतंय गाणं. हि पण आयडियाची कल्पना मला भलतीच भावली. म्हणजे गाणं सुरु होतं पहिल्या कडव्यानी नेहेमीप्रमाणे, मग दुसरं, तिसरं कडवं, मग तिसरं दुसरं आणि पहिलं कडवं, हा उलटा क्रम घेतल्यामुळे पट्टाकिनी लक्षात येत नाही. मस्त नवीन काहीतरी, डोकं लावलंय. तुम्ही पण ऐका ते गाणं / आस्वाद घ्या आणि कळवा कसं वाटलं ते. ह्या प्रयोगामुळे आता
१. ऐकणाऱ्याला पुन्हा ते गाणं प्ले करण्याची गरज नाही
२. लूप मधे पण टाकण्याची गरज नाही, अनेकदा ऐकायला.
https://youtu.be/vhZP_4AfmUo "Mai to tere piche ho liya...."
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा