शुक्रवार, २५ मार्च, २०२२

शिट्ट्या

माझ्या अगदी लहानपणापासून आमच्याकडे मिठू होता. त्याला पिंजरा आणला होता, पिंजरा स्वच्छ राखण्याची सर्वांची धडपड, त्याची नागपूरच्या उन्ह्याळ्यातली आंघोळ, दिवसभर गर वाटावं म्हणून एक तर त्याला घरी दारं खिडक्या लावून मोकळं सोडायचे, नाही तर छोटसं ओलं फडकं गुंडाळायचे पिंजऱ्या भोवती, किंवा त्याला पण / त्याचा पिंजरा कूलर मधे ठेवायचा, पाणी नेहेमी द्यायचं त्याच्या वाटीत ई. त्याचे खाण्याचे नखरे भारी. शिळी नाही सकाळची पोळी संध्याकाळी चालत नसे पठ्याला. डाळिंबाचे दाणे काय, हिरवी मिरची ई. अगदी थाट होता. माझ्या मोठ्या भावाला स्वःत वैविध्य शिट्ट्या मारायला फारच आवडत असे. त्यामुळे त्याने मिठूला शिकवलं म्हणण्यापेक्षा मिठू इतका जगावेगळा हुशार होता कि तो देखील शिकला, शिकत गेला आणि वाजवायचा नेहेमी. कधी कधी तर जुगलबंदी असायची दोघांची. आणि आमच्या कानांची पर्वणी. फक्त शिट्या नाही तर आईची एक रोजनिशी असायची, सकाळी ओळीने मला हाक मारणे, त्यात वैविध्यता, कधी घड्याळ बघ वेळ झाला म्हणून, तर कधी शाळेवरून, तर कधी अजून काही. हा मिठू ते पण शिकला, नुसतं आत्मसात केलं नाही तर अगदी तश्या हाका मारायचा आईच्या बरोबरीने, बाप रे. देवा, काय तो, नावापुरता फक्त पक्षी, पोपटपंची सुरूच अविरत. त्याच्या देखील हाकेने मी उठली नाही तर अस्वस्थ होत असे. त्याच्या आवडीचं खायला नसेल तर फारच अस्वस्थ आणि पिंजऱ्याला उलटा टांगून बसत असे. आणि मला लहानपणी शाळेत कोणी विचारलं कि तुमच्या कडे किती जण राहतात मी बाळबोधपणे सांगायची, ५, मी बाबा आई दादा आणि मिठू देशपांडे. आई ग. असा हा आमच्या कुटुंबाचा फार उत्साही सदस्य. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...