गुरुवार, २४ मार्च, २०२२

माया - प्रेम - उब


मटकी, मूग आणि तत्सम सगळे कडधान्य ह्यांना मोड येतात, स्वभाव आहे त्यांचा. आणि तो स्वभाव आपल्याला फार पूरक असा आहे. मोड आलेले कडधान्य खावेत,फारच पौष्टिकता वाढते त्याने. आणि मोड येणे हि एक मस्त प्रक्रिया आहे, ती जेवढी माणूस म्हणून आपण आनंदाने करतो, तितकीच ते देखील आनंद उपभोगत असतीलच. मोड आणण्याचे दोन प्रकार मला माहित आहेत. एक म्हणजे परंपरेनुसार जुन्या फडक्यात बांधून ठेवणे. आणि ते जुनं फडकं म्हणजे आईची जुनी साडी, जुन्या साडीचा एक भाग ई. आणि दुसरा आधुनिक / अत्याधुनिक प्रकार म्हणजे मोड आणण्याचं भांड / स्टॅन्ड. त्यात  ठेवायचं आणि वर भिजलेले कडधान्य. मग एखाद दिवसात तरारून मोड येतात. दोन्ही पद्धतीने मोड येतात च, आणि कदाचित दुरून बघितलं तर पौष्टिकता पण सारखीच असेल दोघात. पण आज मला एक फरक प्रकर्षाने जाणवला. स्टॅन्ड मधे आलेल्या मोड मध्ये माझ्या दृष्टीने ती माया, उब आणि प्रेम अस्तित्वात नसतंच मुळी. आईने अनेक वर्ष परिधान केलेल्या साडीची तुलना महागातल्या महाग स्टॅन्ड ला होऊच शकत नाही. मी दोन्ही प्रकारे मोड आलेले खाल्ले आहेत, फरक जाणवला म्हणून हि अनुकथा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...