गुरुवार, २४ मार्च, २०२२

शांतात आणि सूर

पुण्याहून मी जेव्हा जेव्हा सावंतवाडीला जायचे तेव्हा तेव्हा आधी आधी फार वेगळं वाटायचं. कारण पहाटे पासून मस्त पियानो ची धून ऐकू यायची, फार सुंदर, श्रवणीय असे सूर, अजून काय हवयं. निरव शांतता सर्वत्र, बैठे बंगले, मोकळी जागा, भरपूर नारळाची आणि बाकीची झाडं आणि वेगळंच वातावरण. सकाळी सकाळी वाहनं, प्रदूषण नाही, वर्दळ नाही, ताजी हवा आणि एकंदरीत स्वर निःसंकोच पणे वावरू शकतात, त्यामुळेच ऐकणाऱ्यालाही वेगळीच मेजवानी मिळते, कान अगदी तृप्त होतात, दिवस प्रसन्नतेने सुरु होतो आणि टिकतो तो उत्साह.

अगदी तशीच मेजवानी मला सध्या लाभते आहे, हो, ह्या इथे, पुण्यात आणि माझ्या घरी. पहाटे / सकाळी माझ्या मैत्रिणीची लेक पियानो वाजवते माझ्या अगदी एक मजला खाली. माझी आणि तिची खिडकी उघडी असते, सकाळचे प्रसन्न वातावरण आणि तिच्या बोटांची जादू, अजून काय हवं आहे दिवसाची सुरवात करायला. गेले ३-४ दिवसांपासून हि मेजवानी मी चाखते आहे. "सोन्याहून पिवळं" अशी ती गोष्ट आहे, कारण एकतर मी तिला अगदी लहानपणी पासून ओळखते, ती पियानो वाजवते इतकं सुमधुर, मंजुळ स्वरात, तालात अहाहा.

सावंतवाडी ला अनेक ख्रिश्चन समाजातले लोक राहतात, त्यामुळे असंख्य चर्च आहेत आजूबाजूला. त्यामुळे मी समजू शकते कि पियानो वर प्रार्थना, किंवा अजून काही धून ऐकू येणं. पण शहरात, दररोज, सातत्याने, आणि घरबसल्या म्हणजे पर्वणीच.

तिच्या बोटांची जादू अशीच कायम राहो आणि मला / आम्हा सर्वांना तिच्या मुळे अप्रतिम रचना ऐकता येत राहू दे कायम हि सदिच्छा.  A big thanks to the player.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...