शनिवार, २६ मार्च, २०२२

उन्हाची तीव्रता

 
दोन काय चारपायांच्या सर्व सजीव प्राण्यांना उन्हाची तीव्रता जाणवत असणारच. आपण माणसं फक्त व्यक्त होतो त्या बद्दल, बाकी नाही. भर उन्ह्याळ्यात पण डांबरीकरण, रस्त्याची कामं आणि बांधकाम मोठ्या प्रमाणावर सुरु असतं. पावसाळ्यात अशी कामं होण्यास अडथळा निर्माण होतो आणि खास करून रस्त्याची काम हिवाळ्यात फार मोठ्या प्रमाणात होत नाहीत. कारणं अनेक आहेत. अगदी संपूर्ण ३६५ दिवस चालणारे दोन अजून व्यवसाय आहेत, ते म्हणजे स्वयंपाक आणि धोबी. ह्या दोन्ही व्यवसायात मोठ्या उष्णतेसमोर सातत्याने उभं राहावं लागतं आणि हात चालवावे लागतातच. अर्थात अगदी जेव्हा सुर्य डोक्यावर असतो, तळपत असतो तेव्हा धोबी आणि घरचे स्वयंपाक घर थोडी विश्रांती घेऊ शकतात, कारण त्यांनी विचारपूर्वक सकाळी लवकर, उन्ह तापायच्या आत कामं उरकली असतात आणि बाकीची ऊन उतरल्यावर करण्याचा मानस असतो. पण खानावळ,किंवा भोजन केंद्र, उपहार गृह ई. तर ती व्यवसायाची वेळ त्यामुळे त्यांना ह्यातून, ह्या गर्मीतून काही पळवाट नाहीच. त्यामुळे जेव्हा जेव्हा माझी घरी मुलं, विद्यार्थी किंवा अजून कोणी जेव्हा उन्हा बद्दल बोलतं / तक्रार करतं तेव्हा मी त्यांना ह्या सर्व लोकांबद्दल सांगते. बऱ्याच जणांचं पोट हातावर असतं त्यामुळे उन्हाळा मी म्हणतोय पण कामं चालूच राहतात आणि राहणार. अशा आहे कि त्यांचे मालक मंडळी कर्मचाऱ्यांची काळजी घेत असतीलच आणि उन्हा पासून संरक्षण करण्याचा प्रयत्न पण करत असतील. ह्या पुढे तुम्हाला कित्ती ऊन आहे असा विचार जरी मनाला शिवला तरी घरची आई, उपहार गृहात कार्यरत असणारे लोक, रस्त्यावर काम करणारे ह्यांचे कष्ट आठवा म्हणजे तुमची उन्हाची, तक्रार करण्याची तीव्रता कमी होईल, त्या सर्वांबद्दल चा आदर वाढेल नक्कीच.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...