शनिवार, २६ मार्च, २०२२

ओम भवती भिक्षां देही

माझ्या लहानपणी किंवा त्या आधीपासून भिक्षा मागणं आणि ते देणं हि परम भाग्याची गोष्ट मानली जायची. माध्यन समयाला दारात कोणी तरी येणं ह्या सारखी दुसरी पर्वणी नव्हती तेव्हा. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्या काळी कधीही मोजून मापून स्वयंपाक करत नसतं, पद्धतच नव्हती. सतत घराचं दार उघड, कोणी ना कोणी येणार आणि ते तृप्त होऊन जेवूनच जाणार. माधुकरी मागायला दारात येणार ह्याची इतकी सवय झाली होती कि त्याची तय्यारी आधीच होत असे, आई करायची. माणसाच्या रूपात, गाय तर अजून कोणी येणार हे नक्की. सगळी घरची कामं घरी त्यामुळे आईला किंवा त्या वेळच्या समस्त स्त्री वर्गाला मानसपूजा हि नकळत सातत्याने सुरूच असायची. एकदा आईची पूजा सुरु असतांना तिला आलेला अनुभव किंवा जाणवलेले भाव ह्या भजनात तिने मांडले आहेत. "गीत गुरुदत्त" ह्या नावाने प्रसिद्ध झालेल्या तिचा पुस्तकातील एक भजन येथे देत आहे. सर्वानी हे भजन वाचा आणि त्याचे भाव थेट तुमच्या मनाला शिवतील आणि भक्तिपूर्ण अर्थ उमगेल ह्या भिक्षे पाठीमागचा ह्याची खात्री आहे. "दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा".

 


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...