बुधवार, १६ मार्च, २०२२

विचारपूस

मी जेथे आधी बसत होते ना ती जागा खूप वेगळी होती. माझी केबिन च्या दाराकडे पाठ असायची, केबिन मधे आम्ही चौघे जण बसत असू आणि माझं टेबल अगदी दाराजवळ. कॉरिडॉर मधून जाता येता मी, माझं टेबल सहज नजरेस पडायचंच. आमच्या ऑफिस च्या बिल्डिंग ची एक खासियत आहे. नवीन येणाऱ्याला तो एक भूल भुलय्या च आहे. समजतच नाही कुठून यायचं आणि जायचं ते. त्यामुळे ऍडमिशन च्या वेळी खास मला आणि आम्हाला हा अनुभव यायचाच कि नवीन पालक आणि विद्यार्थी मला विचरायचाच पत्ता, हे कुठे आहे, ते कुठे आहे ई. आणि मी पण उत्साहात सांगायचेच कारण ते माझं कर्तव्य होत आणि मी त्यांना सहज दिसायचे, त्यांना मला विचारावं असं वाटायचं ई. पण कधी कधी खुपच जणं विचारले तर मात्र वाटायचं कि काय हे. असो.

आता माझी जागा बदलली आहे, मी एका आड पडद्यात गेली आहे बसायला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. माझी जी केबिन आहे ती आत आहे, तिला एक तीच स्वतंत्र दार आहे.  अश्या दोन केबिन आजूबाजूला आहेत आणि त्या दोघांसमोर अजून एक कॉमन दार देखील आहे. इतकं आत मी बसते. तरी देखील मला अजूनही असंख्य लोक येऊन विचारतातंच हे कुठे आहे आणि ते कुठे सापडेल. मला महद आश्चर्य वाटत ह्या गोष्टीच, पण असो, माझं काम आहे ते. आणि बडबडण्याचा, मदत करण्याचा स्वभाव असल्यामुळे देखील असेल कदाचित. कोणास ठाऊक अजून पण कसे अनेक जण येतात विचारायला, अजिब असलं तरी समाधान मिळतं हे नक्की. लोकांचा वेळ वाचतो आणि कदाचित अशी सर्वांना हवी तेव्हा छोटेखानी मदत करावी हे त्या चौकशी करणाऱ्याला समजत / उमजत असेल. हे हि नसे थोडके. "असे चौकशी करणारे येति आणि स्मृती ठेवुनी जाती".

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...