आपल्याकडे एक अलिखित नियम आहे, अप्रतिम प्रथा आहे, कोणीही दिलेला डब्बा रिकामा द्यायचा नाही परत. डब्बा असो, ताटली, वाटी किंवा भांड काहीही. फुल ना फुलाची पाकळी द्यायचीच त्यात, हमखास. मी माझ्या मुलांच्या वाढदिवसाचा केक आणला होता मोठ्या डब्ब्यात घालून म्हणजे माझ्या ऑफिसच्या सगळ्या मैत्रिणींना पोटभर चव घेता येईल म्हणून. त्यातली च एक उत्साहाने भरपूर अशी माझी मैत्रीण तो डब्बा घरी घेऊन गेली, आणि काही दिवसांनी खास माझ्यासाठी मला आवडतो म्हणून त्यात भरपूर चिवडा घेऊन आली. तो चिवडा तिने घरी तय्यार केला होता सगळं साग्रसंगीत सामग्री वापरून / पदार्थ घालून आणि भरपूर प्रमाणात ते. आजकाल प्रत्येकाला इतकी प्रचंड कामं असतात कि ज्याचं नाव ते, घरी दारी आणि सर्वत्र सदोदित. त्यातून पण ह्या माझ्या मैत्रिणीने तिचा बहुमूल्य वेळ काढला, आणि खास माझ्या साठी, घरच्यांसाठी, बाकी मैत्रिणीसाठी चिवडा करायचा घाट घातलाच. डब्बा आणून दिला प्रेमाने, मी पण तो स्वीकार केला आणि उत्साहाने चिवडा एन्जॉय करायला सुरवात केली देखील. काय मस्त चविष्ट झाला होता म्हणून सांगते, अहाहा. मला तर नेहेमीच दुसऱ्यांच्या हातची चव आवडतेच, चिवडा त्यातून फारच प्रिय, आणि आयता मिळालेला तो हि घराचा बनवलेला, मग अजून काय पाहिजे. सोन्याहून पिवळे जसे. अहाहा, मज्जा आली. भरपूर कष्ट केले होते मैत्रिणीने हे दिसत होत आणि एका वेळी अनेक कामे उरकली होती हे पण स्पष्ट झालं. कारण तो असा तसा साधा सुधा चिवडा नव्हताच मंडळी, कुठेही कधीही तुम्हाला खायला मिळणार नाही अस्सा होता तो. अतिशय खास. वेगळी होती चव, पण मला फार भावली. नेहेमीच्या पद्धतीचा आणि चवीचा चिवडा तर कोणीही तय्यार करेल पण असा खास फक्त हाच. काय खास होत म्हणता? अहो तो अख्खा चिवडा बार्बेक्यू होता, अगदी कांदाच्या फोडी पासून, मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीर ई. सगळं आधी फोडणीत घातलेले करपलं होत किंवा तिला तसाच नवीन पद्धतीचा चिवडा सर्वांसमोर मांडायचा होता, परिचय करायचा होता हे माहित नाही, मी त्या भानगडीत अजिबात पडले नाही, पण जे काही झालं होतं, केलं होतं ते भन्नाट आणि अप्रतिम चवीचं होत हे मात्र नक्की. बार्बेक्यू चिवड्याचा विजय असो, माझ्या मैत्रिणीचा देखील विजय असो.
बुधवार, १६ मार्च, २०२२
बार्बेक्यू चिवडा
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा