बुधवार, १६ मार्च, २०२२

एक भेट

एक होती म्हणजे आहे राजकुमारी आणि अर्थातच एक राजकुमार पण. अहो, त्या पद्धतीची राजकुमारी नाही हो, आधुनिक. म्हणजे बहुतांशी सर्वच आईवडिलांना आपली मुलगी अगदी राजकुमारी सारखी वाटते कि नाही? अगदी तशीच. तर ह्या राजकुमारीला एक राजकुमार आवडत होता आणि अर्थातच त्याला देखील ती. दोघांचं फारच सख्य, इतकं कि राहवलं जायचं नाही एकमेकांना भेटल्याशिवाय, नेहेमीच. उत्कंठ प्रेम होत दोघांचं एकमेकांवर अगदी दृष्ट लागेल असं. आजकाल भेट म्हणजे मिठी मारणं हे अगदी सहज घडतं, सामान्य माणसांसोबत सुद्धा, मग तर हे राज कुमार आणि कुमारी होते, तसे. हे तर एकमेकांशी भेटण्यासाठी वाट बघतच असायचे नेहेमीच, अगदी आतुरतेने, पण ह्यांच्या शिवाय अजून कोणीतरी दोघे देखील तितकीच प्रतीक्षा करायचे एकमेकांची, आतुरतेने, ह्यांच्या सोबत, ह्यांच्या बरोबरीने  भेटी ची. कारण? फार सोप्प आहे. राज कुमार आणि कुमारीच्या भेटी दरम्यान ह्या दोघांनाही भेटण्याचा मोक्का मिळायचा आणि ते क्षण ती दोघे इतकी भरभरून जगायची जसे कि दोन नाही एक अप्रतिम सुवास आहे, सुगंध निर्माण झाला आहे. अगदी एकमेकांना पूरक असा, अगदी दोन्ही मिळून एकचं असल्यासारखा, वेगवेगळा असला तरी. ते दोघे इतक्या प्रकर्षाने, आतुरतेने इतकी एकमेकांची वाट बघायचे, किंवा बघत असतील अशी कधीच, कोणालाच पुसटशी देखील कल्पना आली नाही. हे गुपित आणि मनोगत जेव्हा त्या दोघांनी माझ्या कानात हळुवार सांगितलं तेव्हा विश्वासच बसला नाही प्रथमतः माझा. असं खरंच असेल का? माणसं पण कदाचित इतकी कोणाची वाट बघत नसतील  बहुतेक, आणि ह्या दोघांनी बघा किती अप्रतिम उदाहरण उभं केलंय सर्वांसमोर. अत्तर / सेंट / पर्फुम लावूनच घराबाहेर पाऊल पडत सर्वांचं आताशा, आणि तो इतका अविभाज्य घटक झाला आहे सर्वांसाठी आता कि त्याचं वेगळं अस्तित्व विसरायला झालंय, म्हणून तर हे माझ्या पुढ्यात मांडल नसेल ना? मग अशी आपल्या नकळत अजून कोण कोण भेटीसाठी उत्सुक असतील, कोणास ठाऊक? पण हे फारच जगावेगळं आणि प्रणयरम्य आहे, कल्पनाविश्वात घेऊन जाणारं, रममाण करणार आहे निश्चित. मला ह्याआधी कधीच स्वप्नात पुसटसा देखील विचार शिवाला नाही कि दोन विविध सुगंध एकमेकांना अनुभवण्यासाठी इतके वाट बघत असतील ते. माझ्या मते प्रत्येक सुगंधाला त्याचा एक प्रचंड तोरा असतो कि त्याच्या सारखा तोच, अजून कोणीच असूच शकत नाही वगैरे. आणि असा तोरा असलेला दुसऱ्या तोडीच्या सुगंधाची वाट बघतो, अहाहा, काय बोलावं, माझ्या कल्पने पलिकडलं आहे. खरंच. त्यांना हवी तेव्हा आणि हवी तेवढी पोटभर भेट घडो, घडत राहो, त्यांच्या पद्धतीने त्यांना आनंद उपभोगायला मिळो हि सदिच्छा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...