बुधवार, २३ मार्च, २०२२

छोटीशी टीप

सध्या उन्हाळा जाणवायला लागला आहे आणि बहुतांशी प्रत्येकाच्या तोंडी आहेच, कित्ती गरमी आहे, काय हा उन्हाळा, असं आणि तसं. असो, स्वभाव अजून काय, प्रत्येक ऋतूत तीच वाक्य. मजेशीर आहे माणूस हा प्राणी.

एक साधं निरीक्षण आहे माझं, कि बहुतांशी मध्यम वर्गीय लोकं, किंवा उच्च मध्यम वर्गीय मंडळी घरी सपाता परिधान करतात आताशा. त्यामुळे घरी असले कि सतत पाय चपलेत, बाहेर पडलं ऑफिस साठी किंवा शिक्षणासाठी किंवा कामासाठी तर बूट किंवा सॅन्डल ई. मग त्या सुदृढ आणि सुंदर पायांना जमिनीचा अप्रतिम स्पर्श कधी होणार मंडळी? एकदा सहज काही वेळ तरी आणि ह्या उन्हाळ्याच्या दिवसात सपाता न घालता घरी वावरून बघा तर आणि मग सांगा कि थोडीशी / किंचित गर्मी ची अनुभूती कमी झाली का नाही ते? ठीक, करणार ना मग हा प्रयोग? चला ताबडतोब करून बघाच. नैसर्गिक उपाय असतांना आपण एकतर फक्त बोलतो नाही तरी काहीबाही खातो / पितो. त्याच्या शिवाय हा छोटेखानी तरणोपाय बघा कशी जादू करतो ते. गारेगार वाटणारच, खात्रीच आहे मला. आणि हो, जर समजा पायाला कचरा लागलाच, तर झाडू आहे कि हो घरी. कधी तरी चुकून ते पण एखाद मिनिटं एन्जॉय करून बघा, शेवटी काय "चेंज ऑफ वर्क इज रेस्ट" हो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...