आधी सुरवातीला अगदी एकीकडून मी हे ऐकलं आणि अगदी किंचित अवाक झाले कारण पहिल्यांदा असं काही तरी मी ऐकत होते. पण त्यानंतर रांगच लागली हो, असंख्य जणींकडून थोड्याफार प्रमाणात तसेच ऐकिवात आले, मग अवाक झाले नाही तर विचार करू लागले. काही जणींनी सल्ले मागितले, फक्त ऐकण्याची विनंती केली तर काहींनी सांगितलं बास. असो प्रत्येकाचं आपलं आयुष्य आणि बघण्याची पद्धत. पण सरसगट ऐकू आलं म्हटलं काय आहे हे नक्की.
सगळ्यांचा अनुभव देणं शक्य नाही पण एक येथे सांगू इच्छिते.
मध्यम वर्गीय मुलगी, उच्च शिक्षित, हुशार, दिसायला चार चौघींसारखी, नोकरी च्या ठिकाणी चमकून उठलेली, दोन मुलींची आई, बायको, सून, काकू आणि बरीच नाती डौलाने सांभाळणारी अशी. आईच्या घरी शिक्षण एके शिक्षण झालं, त्यानंतर घर-ऑफिस-मुलं-सासर ई. फक्त सांभाळलं सातत्याने अनेक वर्ष, कुठलाही बदल नाही आणि स्वतःसाठी वेळ द्यायचा असतो, किंवा आपण महत्वाचे आहोत स्वतःला हे माहितच नाही / नव्हतं.
अनेक वर्ष नोकरीत देखील सातत्य सांभाळलं, ठिकठाक वेळेआधी पोचायचं आणि मन लावून काम करायचं. कुठेही बढेजावं नाहीच, किंबहुना मेकअप करून, उगाचच पुढे पुढे मिरवायला वेळ तर कधी नव्हताच, डोक्यात देखील आलं नाही आणि स्वभावात नव्हतंच. पण "त्याच्या" मनात कदाचित काही वेगळं होत, किंवा काही तरी निराळं होणार होत नकळत, आणि ते झालं, किंवा होतंय.
तिच्या भल्यामोठ्या कंपनीत एक नवीन अतिउच्च पदावर एक भारदस्त व्यक्तिमत्व रुजू झालं. अर्थातच इतक्या मोठ्या पदावर म्हणजे वय, उंची, अनुभव सगळं म्हणजे सगळंच उंच, नाही का? पण काही गोष्टी वेगळ्या पण होत्या. साधारण एक वर्षांपूर्वी ते रुजू झाले. आधी नवीन कंपनी, काम, माणसं ई. समजावून घेते घेत अगदी प्रत्येक व्यक्तीशी परिचय करण्याचा त्यांचा स्वभाव होता. त्यानुसार प्रत्येकाची ओळख करून घेतली, कामानुसार त्यांच्या बरोबर उठबस सुरु झाली, कुठलीही पदक्रम किंवा श्रेणी चा अडथळा न येऊ देता. वेगळी होती त्यांच्या कामाची पद्धत कदाचित. कशी, कुठे, केव्हा, कधी माहित नाही पण माझ्या एका मैत्रिणीची त्यांच्याशी ओळख झाली. बहुतांशी सगळ्यांचीच माहिती त्या नवीन व्यक्ती ने आधीच मिळावी होती, त्यात हि पण होती, कारण तिने एकाच ठिकाणी अनेक वर्ष सलग काम केलं होत आणि ती देखील त्या कंपनीत मानाच्या ठिकाणी होती. ओळख हळू हळू वाढत गेली, आणि आज त्याला एक वर्षाहून अधिक काळ झाला देखील. दोघेही व्यवस्थित कुटुंबातून आले आहेत, त्या सरांना तर सून पण आली आहे. असं असतांना देखील दोघांना एक मेक खूप आवडतात, त्याच्या भेटीगाठी जेव्हा होतात तेव्हा अनेकविध विषयांवर मस्त बिनधास्त चर्चा होते. त्यांनी हिच्या तले तिला माहित नव्हते किंबहुना दडलेले असंख्य गूण प्रकाश झोतात आणले. दोघांनाही एकमेकांसोबत वेळ घालवायला प्रचंड आवडतो. हि सगळी पार्श्वभूमी देण्यामागची बरीच कारणं आहेत. ह्या माझ्या मैत्रिणीला माझ्याशी ह्या तिच्या नवीन कनेक्ट बद्दल का बोलावसं वाटलं माहित नाही.
ती: "हे बरोबर आहे का गं?, असं का होतंय मला? माझं काही चुकत नाही हे मला माहिती आहेच, कदाचित मी कधीच कोणालाच मित्र मनाला नाही, कधीच उगाचच कोणासोबत कुठल्याही विषयावर बिनधास्त बोलले नाहीच. आणि मला फार म्हणजे फार आवडतं त्यांच्या सोबत वेळ घालवायला, अगदी मर्यादेत राहून देखील", आणि तिच्या प्रश्नांची सरबत्ती सुरूच राहिली.
मी:"अगं एखादं आंतरराष्ट्रीय गोड आपण कधीतरी चाखतो, साधा केक सुद्धा वर्षातून एकदा किंवा दोनदा खाल्ला जातो. गोड आवडतं म्हणून नेहेमी खाल्लं तर त्याचे दुष्परिणाम जास्त होतात आणि हे तुला चांगलाच ठाऊक आहे, नाही का?"
"मन उधाण वाऱ्याचे..." असं काही झालं तिला. ती म्हणते ना "ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे..." हे त्या भगवंता करता म्हटलं गेलं असलं तरी देखील मला हे आताशा जाणवतंय, अचानक, नकळत, मग ह्याला काय म्हणायचं?
मी देखील मग गप्प बसणं स्वीकारलं.
माझ्या इतके गूण आहेत हे मला पहिल्यांदा समजलं ते देखील फार सभ्यपणे. त्यांना जर काही भलतं वागायचं असतं ते आत्तापर्यंत काहीही कदाचित करू शकले असते पण नाही. त्यामुळे आता मला हे नवीन कनेक्ट टिकवायचं आहे, वेळ घालवायचा आहे, मर्यादेत राहून पण एक मैत्र्य भरभरून जगायचं आहे आणि महत्वाचं म्हणजे ह्या तिच्या कनेक्ट ला तिच्या दोन्ही मुलीची अनुमती, संमती आहे, त्यात आनंद आहे. ती भरभरूनच जगली आज पर्यंत पण हे अनपेक्षित पुढ्यात आलेलं देखील तिला जगायचं आहे स्वछंद पणे. पुन्हा एकदा "दिवस तुझे हे फुलायचे झोपळाल्यावाचून झुलायचे" अगदी तस्से.
आणि अगदी हेच किंबहुना काही अंशी इकडे तिकडे मला असंख्य जणीं कडून पण ऐकू आलं, भासलं, जाणवलं.
हे का होतंय हे मला अजिबात माहिती नाही, मला ह्यात पडायचं देखील नाही आणि प्रत्येकालाच मित्र असण्याचा हक्क आहेच, तो जगा सांभाळून. बास.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा