शुक्रवार, १८ मार्च, २०२२

अपार कष्ट

माझं पुण्याच्या बालेवाडी भागात आधी वास्तव्य होतं. ह्या नवीन दिवसात जेव्हा घरून काम करणं सुरु होत तेव्हा मी पहाटे आवर्जून थोडा वेळ आमच्या गल्लीतच पायी फिरायला जायची. थोड्याश्या चकरा मारल्या कि बरं वाटायचं, मनाला आणि शरीराला देखील. मग दिवसभर मिटींग्स आणि वर्ग, बहुतांशी बसून राहावं लागायचं. त्यामुळे रात्री जेवण झाल्यावर शतपाउली पण नक्की करायचो. पहाटे बहुतेक शेवटची चक्कर असतांना एक काका त्यांची सायकल घेऊन यायचे, कधी चालवत तर कधी पायी, अगदी दररोज, न चुकता आणि एखादवेळी घड्याळाचा काटा मागे पुढे होईल पण ह्या काकाची वेळ पक्की. काही दिवसांनी त्यांची, त्यांच्या येण्याची, वेळ पाळण्याची इतकी सवय झाली नकळत कि मला समजायचं मी वेळेत का उशिरा ई. आता आम्ही बाणेर मधे राहायला आलो आहोत. पुण्यातल्या जागांची नावं विचारपूर्वक देते आहे. मी दररोज साधारणतः आठ - सव्वा आठ च्या दरम्यान ऑफिस ला जायला निघतेच. बाणेर हुन पाषाण रोड,सुस ई. करत मी ऑफिस ला पोचते. काही दिवसांपासून माझा माझ्या चार डोळ्यांवर विश्वासच बसत नाही आहे. पाषाण काढून सुस कडे जातांना एक रास्ता हा प्रचंड चढ / उतार आहे. मी उताराच्या दिशेने आणि एक काका सायकल हातात घेऊन चढतांना दिसतात दररोज. मला शंका आली पण खूप दिवस बघितल्यावर खात्री पटली ते बालेवाडीला दिसायचे ते हेच काका,पाव विकणारे काका. तो प्रचंड चढ, सायकल, ओझं / सामान, वय, पायात अगदी साध्या सपाता आणि बालेवाडी ते पाषाण हे मोठं अंतर त्याच्या वयोमानानुसार. आई गं, डोळ्यात पाणी तरल्याशिवाय राहतंच नाही. किती म्हणजे किती कष्ट ते, आणि साधे पाव / इतर छोटेमोठे बेकारीचे पदार्थ विकून काय कमवत असतील ते. त्या काकांना संधी मिळावी / जादू व्हावी असं काही होऊन एखादी छोटी जागा मिळाली तर सोप्प होईल, किंवा अजून त्यांना थोडंस सोयीचं होईल असं काहीतरी गाळा / बैठं काम, पण असं इतकं प्रचंड अंतर पायी + सायकलीवर सामान घेऊन फिरणं नको. एकदा लवकरच बोलून बघते त्यांच्याशी, काही उपाय शोधात येतो ते का.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...