मला जे काय पुसटसं आठवतं त्याप्रमाणे माझा वाढदिवस म्हणजे शाळेतल्या वर्गातल्या सर्वांना एक एक चॉकलेट द्यायचं, घरी आई औक्षवण करणार, गोड-धोड आणि नवीन फ्रॉक, बास.
मग आले भन्नाट महाविद्यालयाचे दिवस, कॉलेज चे वैविध्य मित्र-मैत्रिणी, शिवाय शाळेतले सख्खे सोबती देखील विविध कॉलेज मध्ये होते त्यामुळे एक नाही दोन वेळा तरी कमीतकमी साजरा व्हायचा वाढदिवस. पण यथेच्छ खायचं, घरचं आईने केलेलं, भरपूर गप्पा आणि मोठ्ठं ग्रिटींग कार्ड सही केलेलं, मजकूर लिहिलेला असं, इतकंच.
मग आले नवे पर्व, माझ्या मुलांचे वाढदिवस आणि त्यात मला एक नवीन शिकायला मिळालं, गिफ्ट्स भरमसाठ घ्यायचेच मुलांसाठी, पार्टी करायची, गेम्स आणि सर्वात महत्वाचं म्हणजे रिटर्न गिफ्ट. सगळी मुलं आतुरतेने त्या क्षणाची वाट बघायची. माझ्या आणि माझ्या सारख्या समवयस्क आयांच्या डोक्याचा भुगा व्हायचा कोणतं रिटर्न गिफ्ट घ्यायचं ते ठरवतांना, वया प्रमाणे, मुला मुलीं प्रमाणे ई. पण ते हि खूप म्हणजे खूप एन्जॉय केलं मी आणि आम्ही सर्वांनी. अहाहा.
ह्या सगळ्यात मला कधीच कुठलंच रिटर्न गिफ्ट मिळालं नाही, तेव्हा प्रथाच नव्हती ना, अर्थात त्याची अजिबात खंत वगैरे नाही, कारण कोणाच्याही वाढदिवसाला आपण म्हणजे माझ्या पिढीतले काही अपेक्षेने जात नाहीच ना. पण हो इतक्यातच मला एका वाढदिवसाचं अनोखं, अचानक रिटर्न गिफ्ट मिळालं, न मागता आणि खूपच मोठं, नेहेमी करता माझ्या सोबत कदाचित टिकणारं / राहणारं असं. आणि माहिती आहे का मंडळी हे अनोखं का आहे, अजून एक महत्वाचं कारण आहे, मी काहीही न देता मला रिटर्न गिफ्ट मिळालं आहे, आहे कि नाही मजेशीर. रिटर्न गिफ्ट म्हणजे जेव्हा तुम्ही गिफ्ट देता म्हणून फुल-ना-फुलाची पाकळी परत दिली जाते ते. ह्या वेळी तरी "गिव्ह अँड टेक" सपशेल खोटं ठरलं आणि फक्त टेक होतं. ते म्हणजे मला आढळलं ते, जाणवलं ते, माझ्यापुरतं असं एक अनोखं नातं, काळजी करणारं, माझी वायफळ बडबड ऐकून घेणारं, मी जे शब्दात पेरते ते वाचून ताबडतोब उत्तर देणारं, मला ओळखणारं, मला सतत प्रेरणा देणारं असं आणि ते देखील काहीही परिचय नसतांना. बहुतांशी लोकांना महागडं गिफ्ट देऊन सुद्धा मनाजोगतं रिटर्न गिफ्ट मिळत नाही, आणि मी बघा.
शुक्रवार, १८ मार्च, २०२२
रिटर्न गिफ्ट
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा