शनिवार, १९ मार्च, २०२२

सेकंडरी

माझे संशोधन करते वेळेचे गुरुवर्य हे एक फार प्रसिद्ध लेखक आणि कवी आहेत. त्यांची बरीचशी पुस्तके प्रसिद्ध आहेत आणि त्याचा खप प्रचंड आहे. एक प्रख्यात तंत्रज्ञानात पदव्या असणारा व्यक्ती, अनेक संस्थांशी जोडलेला, स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी चालवणारा असा प्रज्ञावंत हा व्यायामाचा भक्त आणि कलाकार हे समीकरण सुरवातीला मला उमगलं नाही. मग हळूहळू जसजशी ओळख होत गेली, त्यांच्या सगळ्या पुस्तकांच्या प्रकाशन समारंभाला मी जात गेली तशी मला त्यांच्या बद्दल थोडी अधिक माहिती प्राप्त होत गेली. एकदा त्यांनी सांगितलं आम्हा विद्यार्थ्यांना, कि हे IIT + IIM + सॉफ्टवेअर वगैरे सेकंडरी आहे माझ्या साठी, माझं प्रेम म्हणजे लिखाण. आणि म्हणूनच त्यांची एकामागोमाग इतकी पुस्तकं प्रसिद्ध झाली, यशशिखरावर पोचली आणि ते अजूनही लिहीत आहेत सातत्याने, न थांबता.

अगदी तस्सेच आज योग करतांना मला एक वेगळा कंगोरा दिसला, जाणवला, डोक्यात आला, का कुणास ठाऊक? मी इतक्यांदा इतकी वर्ष योग केला, शिकले, शिकवला देखील छोट्या प्रमाणात, पण आजच हे माझ्या डोक्यात का आलं हे मला माहित नाही. तर माझी योग गुरु मला आधी कुठला व्यायाम  करायचा, कसा योग्य पद्धतीने करायचा, का करायचा, कितीदा करायचा ई. समजावून सांगत होती आणि मग मी ते करत होते. त्या वेळी ती उत्कृष्ट, छान, उत्तम, मस्त जमतंय, किती छान, आणि असे कित्येक एकामागून एक अलंकारीक, उत्तेजना देणारे शब्द उच्चारत होती. जसे कि मी च ह्या जगावेगळी आणि सर्वोत्तम योग आसन करते आहे. पण ते मला फार म्हणजे फार भावलं, आवडलं आणि तो एक विचार मनाला शिवून गेला कि व्यायाम, त्याचे फायदे, ई. हे सेकंडरी, योग का करतात लोक (माझ्या सारखे) इतक्या उत्सुकतेने कारण त्यांना ते शब्द भावतात, आवडतात, उत्साह देऊन जातात, पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटतात आणि त्यामुळे नकळत योग पण होऊन जातो, कधी ते समजत देखील नाही. अगदी जसे लहान मुलांना दररोज दोनदा जेवू घालतांना गोष्ट सांगितली जाते. गोष्ट जरी सेकंडरी असली तरी ते गुंगतात त्यात आणि
कधी जेवण संपत कळत देखील नाही.

मी मागे एकदा हा प्रश्न माझ्या समस्त वाचकांना विचारला होता, कि बायका बाहेर जेवायला का जातात? चव बदल म्हणून, नवीन पदार्थ  खायला,कंटाळा आला स्वयंपाकाचा म्हणून, का पैसे उधळायला? हे सगळं सेकंडरी, माझ्या दृष्टीने फक्त आणि फक्त एकच कारण, तेथे वाढपी पुरुष असतात आणि ते थोडसं / अगदी किंचित कुठेतरी समाधानकारक असतं बहुतांशी सर्वजणींना म्हणून, नाहीतर त्या स्वतः उत्कृष्ट स्वयंपाक करतात.

ते चार गोड शब्द ऐकायला जाणाऱ्यांनो अशीच सवय स्वःताला देखील लावा, जमेल तसं, जमेल तेवढं आणि जमेल तेव्हा बाकीच्यांशी पण गोड / चांगलं / उत्साहवर्धक असं बोला, आणि मग बघा तुम्हाला स्वतःला ते किती समाधानकार ठरत ते. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...