मी हे अगदी अगदी छोट्याश्या विषयांवर लिहीत असते, ते विषय जेव्हा मला सुचतात, डोक्यात येतात तेव्हाच्या तेव्हा जर मी नमूद करून ठेवले नाहीत ना तर मग नंतर काही केल्या अजिबातच आठवत नाहीत. मागे एकदा लिहिल्याप्रमाणे मी जेवढा जमेल तेवढा तंत्रज्ञानाचा उपयोग करते मुद्दे, विषय टिपून ठेवायला. कारण ते अगदी माझ्या हातात असतं, आवाक्यात असतं आणि सहजी वापरता येतं, नंतर उघडून मग त्यावर लिहिता येत, मांडता येत. मी कधी मोबाईल मधले नोट्स अँप उघडते आणि महत्वाचे शब्द लिहून ठेवते, किंवा रेकॉर्ड करण्याचं अँप वापरून थोडक्यात माझ्या डोक्यात आलेले, गुंफलेले शब्द बोलून साठवते. मी ऑफिस मधे किंवा एका जागी लॅपटॉप समोर असले तर नोटपॅड उघडून त्यात फटाफट लिहिते ई. अधेमधे मग फोन वर नोट्स, रेकॉर्डिंग केलेलं किंवा नोटपॅड मधे टिपून ठेवलेलं उघडते आणि लिहायला घेते, जसं आज झालं.
एक रेकॉर्डिंग प्ले केलं आणि त्याचवेळी माझी बॅग भरायला घेतली कारण थोड्याच वेळात घरी निघण्याची वेळ होणार होती. आणि त्या विविध गोष्टी करते वेळी खरंच सांगते माझाच मला आवाज नाही ओळखता आला, त्यावेळी मी कुठल्या मूड मधे रेकॉर्ड केलं, रेकॉर्ड करतांना काय विचार होते, त्या आधी मी किती दमले होते, कुठून आले होते हे सगळं उतरलंय त्या रेकॉर्डिंग मधे, हे मला प्रकर्षाने जाणवलं. कदाचित ज्या विषयावर मी भाष्य केलं आहे तो विषय देखील तस्साच असेल म्हणून तो तसा आवाज. माहित नाही, आठवत नाही, पण अचानक खूपच महिन्यांनी ते ऐकलं म्हणून वेगळं वाटलं. आणि तसेही प्रत्यक्ष बोलतो तो आवाज आणि मशीन मधून येणार ह्यात फरक असणारच. माझ्या फोन ची रेकॉर्ड करण्याची क्वॉलिटी / दर्जा मला फार भावला आज. ज्या वेळी मी ते रेकॉर्ड केलं तेव्हा शांतता होती आजूबाजूला हे देखील जाणवलं, कारण अधे-मधे कुठलाही दुसरा आवाज नाही. मी ऐकलं होत आज शिकले पण स्वतः कडून, माझाच आवाज ऐकून असंच बोलायचं का वेगळं, पुढल्यावेळी रेकॉर्ड करतांना सावध / जागरूक राहायचं का बिनधास्त जसं जमेल तसं शांतपणे बोलायचं, रेकॉर्ड करायचं? अगदी जस्ट गो विथ द फ्लो म्हंटल्यासारखं हे आणि बरेच काही. माझीच मला नव्याने ओळख झाली, थोडीशी अपरिचित वाटत होते काही क्षण पण आवडलं ते मला. असा कधी अनुभव येईल हे माहित नव्हतं. मज्जा आली एकंदरीत ह्या सगळ्या लिखाणामागच्या विविध प्रोसेस हाताळतांना, त्या वेळी तो क्षण तो विषय हातातून निसटू न देण्यासाठी केलेली धडपड अनुभवतांना पुन्हा एकदा आज. फोन ला, नोटपॅड ला, नोट्स अँप ला, लॅपटॉप ला, त्या विषयांना, रेकॉर्ड अँप ला आणि गुगल बाबा ला शतशः धन्यवाद. ऍक्टिव्ह मेडिटेशन सारखं भासतंय मला हे रोजचं लिहिणं, फार मनापासून होतंय माझ्या हातून हे पिटुकलं कार्य.
शनिवार, १९ मार्च, २०२२
अनोळखी असं काही
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा