जुळवून घ्या नाही, स्वीकार करा / मान्य करा. अड्जस्ट नाही अकॅसेप्ट करणं हितावह, बहुउपयोगी आणि करायला लागलं कि सोप्प असं. आज मला हे पुन्हा एकदा पटलं अगदी मनापासून. का म्हणताय? सांगते. तर त्याचं असं झालं आज कि मी योग क्लास ला गेले होते, सगळे आसनं झाली आणि मग माझं सर्वात आवडतं आसन शवासन. ते सुरु करते वेळी माझ्या योग गुरूंनी काय करायचं ते समजावून सांगितलं आणि हळुवार आवाजात सूचना / instruction द्यायला सुरवात केली. तिला आता माझा सगळा इतिहास माहित असल्यामुळे असेल कदाचित पण म्हणाली कशी, "प्रिती तुझे पाय दुखत आहेत हे स्वीकार कर, तरी देखील ते रिलॅक्स झाले आहे, तुला आज त्यांनी दिवसभर ऑफिस च काम करायला मदत केली, गुढगा पण दुखतोय पण ठीक आहे तो देखील आता रिलॅक्स आहे....". मग सहज विचार आला कि मी काय काय स्वीकार करायचं, ऑफिस मधलं सगळं, घरचं पण, वेदना पण आणि बरेच काही, आणि मग मीच का? तेव्हा त्याचं उत्तर देखील पट्टाकिनी मिळालं देखील अगदी त्याच वेळी, कि जसं मला सगळं स्वीकार करता येतंय, जमतंय तसेच माझ्या आजूबाजूचे मला पण स्वीकार करत आहेत ना? मग झाली ना फिट्टमफाट. मग काय आनंदाने आणि जास्त प्रकर्षाने ह्या नंतर मी तरी स्वीकार करणार आहे / जुळवून घ्यायचा प्रयत्न करणार आहेच हे नक्की, कारण त्यात मला समाधानंद मिळतो भरपूर, पोटभर. व्यक्ती, वागणं, प्रसंग, स्थिती, आणि सगळे म्हणजे सगळे स्वीकारा सतत मंडळी, आणि स्वतः फरक अनुभवाच. सर्वत्र हिरवळ दिसेल, मन उंच भरारी घेईल, उगाचच संगीत कानावर पडल्यासारखं वाटेल, झुल्यावर बसल्याचा आनंद मिळेल, आणि ......
शनिवार, १९ मार्च, २०२२
स्वीकार
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा