मी स्वःत एक शेतकरी नाही, त्यामुळे मला फक्त थोडक्यात माहिती आहे खरबूज, टरबुज अश्या फळांबद्दल आणि अर्थात त्यांच्या वापराबद्दल. माझ्या लहानपणी पासून ते माझ्यामते मी ९-१० वीत होते तोवर पाटावरवंटा होता वाटण-साटण करायला माझ्या घरी आणि जुना माठ नागपूरच्या भयानक उन्हाळ्यात भाज्या जपून / सांभाळून ठेवायला, बास. मिक्सर, फ्रिज ई. गोष्टीचं फार उशिरा आगमन झालं माझ्या घरात, अर्थात त्याकाळी आमचं घर पहिलंवहिलं होतं ह्या आधुनिक गोष्टी आणण्याकरता. असो.
तर हे बहुउपयोगी फळं खरबूज, टरबूज ई. उन्हात / उष्णतेत, गरम ठिकाणी तय्यार होतात, बहुतांशी समुद्रकाठी, नदीकाठी किंवा इतर ठिकाणी. भरपूर ऊन, ते गरम वातावरण आणि रेती मिश्रित माती फारच उपयोगी ह्या फळांना, त्यांचा आकार, गोडवा, चव, सुगंध आणि बरेच काही मिळण्यासाठी. असो, असे हे उष्णतेच्या सानिध्यात वाढलेले फळ जेव्हा आपण घरी आणून खातो तेव्हा घरातच ठेवावे, नाहीतर तय्यार असतील तर सर्वांनी मिळून मिसळून ताबडतोब फस्त करावे आनंदाने. माणूस हाच एक बुद्धिवान प्राणी असल्यामुळे आपल्याला असं उगाचच वाटतं'कि आपण जगावेगळे स्मार्ट आहोत सर्वच बाबतीत. त्यामुळे अशी फळं आणून किंवा तोडल्या तोडल्या शीतकपाटात ठेवली जातात, टिकवली जातात आणि थंड फळं खाण्याचे चोचले पुरवले जातात. कदाचित त्यामुळेच म्हणजे उष्ण वातावरणात वाढलेले, मग सबंध / पूर्ण फळं तसेच शीतकपाटात ठेवलेलं, किंवा कापून ठेवलेलं, कापलेल्या फोडी विकत आणलेल्याच सेवन हे घातक ठरतंय माणसाच्या प्रकृतीला. हे एक कारण असू शकतं माझ्या मते. माझ्या लहानपणी बहुतांशी बाबा कचेरीतुन येता येता किंवा आठवडी बाजारातून फळं / पेटी आणली जायची, ती तय्यार झाली कि रात्री सगळे मिळून चिरून संपायची. ते जास्त योग्य होतं. जमल्यास हे असेच सामान्य तापमानातं असलेली फळं खा, प्रत्येक वेळी जूस, मिल्क शेक ई. चा अतिरेक नको, फोडी खाण्यातच / अख्ख फळ खाण्यात वेगळी मज्जा, व्यायाम होतो, जास्त पोषक तत्व मिळतात शरीराला. आपल्या स्वतःच्या आणि घरच्यांच्या तब्येतीच्या कुरबुरीचं एक कारण दूर करण्याचा प्रयन्त करा, ताज्या फळांचं सेवन करा आणि सुदृढ राहा.
गुरुवार, ५ मे, २०२२
कुरबुरीचं एक कारण
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा