माझं ह्या म्हणी प्रमाणे काहीस झालं होतं. माझं माझ्या नागपूर वर, नागपूरकरांवर इतकं नितांत प्रेम आहे आणि होतं कि जेव्हा मी सासरी गेले माझं नागपूर सोडून तेव्हा पासून आज तागायत नुसता जप सुरु असायचा माझा. त्यामुळेच असेल कदाचित प्रत्येक ठिकाणी, जेथे पाहू तेथे माझी नागपूरकरांशी भेट होत असे, भारतात आणि भारता बाहेर देखील. माझ्या नागपूर ची ओढ इतकी जास्त होती, इतकी वर्ष अस्वस्थता देत राहिली कि सरते शेवटी गेल्या सप्टेंबर मधे मला माझ्या नागपूर फक्त जायची संधीच मिळाली नाही तर चक्क पाच महिने वास्तव्य झालं. अर्थात त्यावेळी डोंगरा एवढं काम होतं पण ती हवा, ते पाणी, ती माती, ते माझे श्वास, तो अनुभव, ती स्पंदन, ती अनुभुती, ती माझ्या मातीतली माणसं ई. सगळंच जगा वेगळं होतं ह्यात काही शंकाच नाही. "काय वर्णू तव गूण.... " असं झालं होतं माझं. आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो चार-पाच अशी माझी स्थिती होती. एका प्रसिद्ध आणि आध्यात्मिक मार्गा च्या यशोशिखरावर असलेली एक व्यक्ती सांगते एक उदाहरण, कि जर तुमची एखाद्या उत्कृष्ट ठिकाणी बदली झाली, किंवा संधी मिळाली आणि ती तुम्ही घालवली हातातून काही कारणास्तव, घरी विचार मंथन झाल्यावर ई. तर त्या बदलीच्या ठिकाणी जे तुम्हाला मिळणार होतं ते कुठल्या न कुठल्या पद्धतीने तुम्हाला मिळतंच, कदाचित पैसे मिळतील, कोठेतरी घर होईल ई. पण नशिबात आहे ते कुठल्या न कुठल्या स्वरूपात येतचं पुढ्यात. नागपूर च्या बाबतीत अगदी तस्स नाही पण मी जितकी वर्ष वाट बघितली पुन्हा एकदा नागपूरला जायची, उत्कट जे माझं प्रेम होतं / आहे त्या शहराबद्दल, त्याची भरपाई हि अशी होईल ह्याची पुसटशी देखील कल्पना नव्हती मला. त्यामुळे मंडळी त्याला खरंच ठाऊक आहे तो कधी कुठे केव्हा आणि किती काळ कोणाला पाठवायचं, का? आपण उगाचच एक तर दोष देत राहतो किंवा वाईट वाटून घेण्यात वेळ आणि ऊर्जा वाया घालवतो. तसं करू नका. इच्छा असणं / करणं वेगळं आणि ती पूर्ण होणं अजिबातच आपल्या हातात नाही. त्यामुळे श्रद्धा आणि सबुरी फारच महत्वाची.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा