छे हो, त्या अगाध आणि तेजस्वी सुर्यबाप्पा बद्दल नाही बोलत आहेत मी. रवी नावाच्या सुकुमाराबद्दल देखील नाही किंवा कुठल्याही दिग्गज व्यक्तिमत्वाबद्दल तर नाहीच नाही.
मला आतापर्यंत फक्त लाकडी, स्टील ची, बॅटरीवर चालणारी, ताकाची, कॉफी ची ई. माहिती होत्या आहेत आणि वापरल्या देखील आहेत. ह्या व्यतिरिक्त स्वयंपाक घरात असलेले नानाविध हत्यारं देखील वापरण्यात आली आहेत गेली कित्येक वर्ष. भारतीय पद्धतीची भारतात, अंतरराष्ट्रीय दर्जाची भारता बाहेर, आणि बरीच अशी. असं सहसा होत नाही पण जर ऐनवेळी चमचा सापडला नाहीच आणि काही मिसळायचं असेल / ढवळायचे असेल तर काटा चमचा पण उपयोगात आणला आहे. त्यामुळे एका शस्त्राचे / हत्यारांचे अनेक उपयोग केले आहेत बऱ्याचदा. असो. माझ्या अभियांत्रिकी शिक्षणाच्या वेळी माझ्यामते पाव-भाजी नावाचं फॅड आलं जोरदार आणि ते शमलं नाहीच आज तागायत. ते आधी फक्त घराबाहेर ठेल्यावर आस्वाद घेण्याची सवय होती /अलिखित नियम होता पण त्या नंतर घराघरात ती तय्यार होऊ लागली अगदी उत्साहाने. मग काय त्याला लागणारे सगळे हत्यारं शिरली स्वयंपाक घरात. माझ्या सारख्या घरी हा पदार्थ खूप कमी वेळा केला जातो त्यामुळे ती भाजी एकजीव करण्यासाठी जो एक मॅशर वापरला जातो तो त्याच्या जागी शांतपणे पहुडला असतो. कधीतरी तो बाहेर निघतो आणि काही मिनिटं फक्त वापरला कि पुन्हा सांभाळून ठेवला जातो. मागच्या आठवड्यापासून मला माझ्या स्वयंपाक घरातून मावशी काम करत असतांना एक वेगळाच आवाज येऊ लागला. बरेच दिवस मी ऐकला पण त्या कडे लक्ष दिलं नाही. पण एकदा न राहावून विचारलंच कि हा वेगळा आवाज कसला? तर म्हणते कशी काही तर नाही, मी फक्त वरण सारखं करते आहे, बास. आणि हो एवढ्यातच हा मॅशर दररोज मी घासलेल्या भांड्याच्या टोपल्यात बघतं आहे. माझ्या छोट्याश्या मेंदूला त्रास न देता मी जाऊन बघितलं तर माझ्या मावशी ह्या मॅशर चा रवी सारखा वापर करत होत्या, त्यांच्या शुद्ध मराठी भाषेत त्या घुसळतं / ढवळत होत्या वरण. मी फक्त डोक्यावर हात मारून घेतला आणि मागल्या पावली परत फिरले. भन्नाट होतं ते दृश्य आणि संकल्पना. साष्टांग नमस्कार, काय डोकं चालवलं आहे. का? कुणास ठाऊक. "दृष्टी आड सृष्टी" हेच बरं. त्या आणि त्यांची रवी, घालूदेत घोळ.
रविवार, ४ सप्टेंबर, २०२२
रवी
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा