माझ्या लेकीचं बारीक लक्ष असतं सर्वत्रच पण दागिन्यांकडे जरा जास्तच. अर्थात हवंच म्हणावं. तर तिला आज एका आजींनी घातलेले भलं मोठं चार का पाच पदरी लांबच लांब मंगळसूत्र दिसलं. ते तिने मला देखील दाखवलं आणि मागेच लागली कित्ती अप्रतिम आहे मम्मा, तू पण घे लगेच. अगदी नम्रतेने (विथ डयू रिस्पेक्ट) मी तिला शांतपणे घरी आल्यावर समजावून सांगितलं मंगळसूत्र आणि जातींची विविधता ह्या बद्दल. एका भल्या मोठ्या सोनाराच्या नवीन जाहिरातीची मदत घेत तिला ते पटवण्याचा अथक प्रयत्न देखील केला, अर्थात जो असफल ठरला. कारण ती अजून देखील ऐकत नाही आहे. ह्या शिवाय तिला मी अगदी त्या आजीं शेजारी स्थानापन्न झालेली माझी महाराष्ट्रियन मैत्रीण आणि तिने परिधान केलेलं मंगळसूत्र दाखवलं पण छे, पालथ्या घड्यावर पाणी. माझ्या काही सहपाठीची उदाहरणं देऊ केली पण... असो तर मुद्दा हा आहे कि दृश्य, भलं मोठं आणि लांब म्हणजे साधारण मराठा किंवा तत्सम, आडनाव वगैरे जाणून घेण्याची गरज नाहीच. दोन वाट्या, एक पदरी छोटेखानी म्हणजे महाराष्ट्रीयन किंवा ब्राह्मण. जाडजूड सोन्याची ठसठशीत सदुर्श्य साखळी आणि बाकी सगळं दडपलेलं म्हणजे दाक्षिण्यात मंडळी, आणि असे बरेच अनोखे प्रकार आहेत. अर्थात फक्त मंगळसूत्र नाही बाकी दागिन्यांवरून पण प्रथमदर्शनी वर्गीकरण सहज शक्य आहे, असो. मज्जा आली, वाद नाही पण संवाद साधता आला. आणि हो आम्ही दोघी अश्याच आहोत, अनोख्या. कुठला म्हणजे कुठलाही विषय चालतो चर्चेला. पण तिची आवड बघून फक्त मस्त नाही वाटलं पण समाधान लाभलं आणि हो तिच्या मुळे आम्ही दोघी खूप पद्धतीचे दागिने (खोटे हो) घेतो आणि मिरवतो देखील. इतकी वर्ष वैविध्य मंगळसूत्र बघितले, परिधान केले, त्या बद्दल सखोल, तपशीलवार माहिती देखील आहे पण ती आज अशी ओठांवर येईल, चर्चेचा अप्रतिम भाग होईल हे कदापि ठाऊक नव्हतं मला. अशी देखील मी कधी कोणाची ओळख माझ्या लेकीला करून देईन हे माहित नव्हतं.
रविवार, ४ सप्टेंबर, २०२२
मंगळसुत्र वरून ओळख
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा