शुक्रवार, १६ सप्टेंबर, २०२२

आवभगत

आपण सर्वच एक "सामाजिक प्राणी" आहे, त्याला आजूबाजूला भरपूर जिवंत माणसं लागतात सातत्याने आणि विविध प्रकारचे. कारण प्रत्येक वेळी प्रत्येकाला काही ना काही बोलायचं असतं, ऐकायचं असतं, सल्ले घ्यावेसे वाटतात किंवा योग्य मार्ग निवडण्यासाठी मित्र-मैत्रिणी, मितवा, नातेवाईक (तानेवाईक नाही हो), शेजारी, वयोवृद्ध ई. सर्व जण लागतातच. जेव्हा जेव्हा आपली एकमेकांशी भेट होते, एका शहरात राहणाऱ्यांशी किंवा बाहेर गावच्या लोकांशी तेव्हा  एक ठराविक / वैशिट्यपूर्ण वाक्य कानावर पडतं आणि ते म्हणजे "आमच्या भागात आलात तर आमच्या कडे या" किंवा "आमच्या गावाला येणं केलतं तर या कधी". बरेचदा ते मनापासून म्हटलेले असतं पण बहुतांशी ऐकतांना तरी उगाच म्हटल्यासारखं वाटतं. मला कधीच हे समजलं नाही कि "आलाच तर या" ह्याचा काय अर्थ आहे? मनमोकळेपणे आमंत्रण द्या कि, देऊन तर बघा समोरच्याला,  तुम्हालाच कित्ती म्हणजे कित्ती आनंद / समाधान मिळेल. तुलना नाहीच, पण आधीच्या वाक्याच्या ऐवजी जर असं कानावर पडलं तर? 

"पुढल्यावेळी नक्की ठरवून या आमच्या घरी, आमच्या गावी, आमच्या घरीच मुक्काम करा आणि मग जा कुठे जायचं तिथे". आपुलकी वाटते, जवळचं असल्याची जाणीव होते, कोणी तरी तुमची वाट बघत आहे ह्यावर शिक्का मोर्तब होतो. आणि हो असं म्हणायचं नसेल तर फक्त बाय म्हणा, तोंडदेखलं बोलावू नकाच. मनापासून बोलावलं कि जायची इच्छा होते, राहावसं वाटतं, "तू मारल्यासारखं कर मी ओरडल्यासारखं करते" ह्यात तो ओलावा नाही, ओढ नाही. "तुम्ही आलाच तर या, सांगा आल्यावर, कळवा, म्हणजे मग आम्ही पत्ता पाठवतो" ई. हे फार कोरडं वाटतं, मग नातं कुठलंही असो, वय हुद्दा लहान-मोठा काहीही असो.

आज हे सगळं लिहिण्याचं कारण?

सांगते. 

आज खरंच खूप वर्षांनी माझ्या एका विद्यार्थिनीचा मला मेसेज आला व्हाट्सअँप वर, जी आता एक उच्चविद्याविभूषित आणि नावाजलेल्या विद्यापीठात प्राध्यापक म्हणून गेली अनेक वर्ष कार्यरत आहे, ती म्हणते कशी "माझ्या गावी आणि घरी या नक्की, राहा, खूप विषयांवर बोलायचं आहे, आपण नक्की भेटू", अहाहा च. कडा ओल्या झाल्याशिवाय राहिल्या नाहीत. इतका आपलेपणा, खूप दुर्मिळ आहे आजच्या जमान्यात. १९९५ साली म्हणजे तब्बल २७ वर्षांपूर्वीची विद्यार्थिनींची हि तुकडी आणि अजून ओळख टिकवून आहेत? ह्या पेक्षा अजून काय हवं एका माझ्या सारख्या शिक्षिकेला.  

अशी आवभगत अजून जिवंत आहे हि फक्त माझ्या नागपूरची खासियत आहे, नागपूरचं पाणीच वेगळं आणि ती टिकून राहणारच, जरी नागपूरकर जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात गेले तरी.   I love my Nagpur even more now. Thank you.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...