मंगळवार, १४ फेब्रुवारी, २०२३

काठ पदर

माझं अख्ख लहानपण आईच्या सध्या काठ पदराच्या साड्या बघण्यात गेल्या. अर्थात आजी, नातेवाईक, शेजार-पाजार सर्वत्र तेव्हा फक्त एकाच पद्धतीचे काठ, ३-४ रंगीत ओळी असेलेला गोंडे लावलेला / न लावलेला पदर हा असा पॅटर्न असायचा. त्या पल्याड जरीची साडी. बास. पाच वार, नववार कुठलीही साडी असो हिच पद्धत, अर्थात महाराष्ट्रात. 


एकदा माझे बाबा कलकत्याला गेले ऑफीच्या कामानिमित्य आणि तेथून ६ का ८ साड्या आणल्या ना आईसाठी. भारीच. नावीन्याने भरपूर. मग डोळ्याला नवीन प्रकार दिसला. हळूहळू मी पण जाणकार होत गेले, फिरले आणि साड्यांचे वैविध्य प्रकार समजू लागले. 


आज जणू जुनी मैफिल जमली होती माझ्या ऑफिस मधे, कारण जाणून बुजून, ठरवून सर्वांनी पाचवारी लुगडं साडी किंवा इरकल नेसली होती. ठराविक जुने ठसठशीत दागिने परिधान केले होते, सर्वचजणी मिरवत होत्या आणि मला जुन्या घरा जवळ, माझ्या गल्लीत, आई आजीसोबत फेरफटका मारता आला सहज. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...