झकास खणाचं परकरपोलकं घालून, गळ्यात सुबक माळ, पायात मस्त छोटेखानी आरामदायी बूट, डोक्यावर फेटा असा काहीसा तिचा त्या दिवशी पोशाख होता. फारच मोठ्या प्रमाणात आणि अतिउत्साहात भले मोठे ढोल, ताशे आणि अजून इतर वाद्य वाजत होती खूप तास आणि त्या संपूर्ण कार्यक्रमाचा ती शांतपणे आस्वाद घेत होती. अगदी म्हणजे अगदी शहाण्या मुलीसारखी बाबांच्या कडेवर विराजमान होती. कुठेही उगाच चिडचिड नाही, रडणं नाहीच, तक्रार नाही, हट्ट नाही. त्यानंतर एक झेंडा हातात दिला कोणीतरी आणून तो सोज्वळ मुलासारखा खूप छान सांभाळून हातात धरून ठेवला. आई कामात होती, बाबा पण बोलत होते आणि हे सर्वांकडे यथेच्छ जात होती. बाकी इतर हजार असलेल्या सहापाठींनी तिला घेतली, जे संपूर्ण अनोळखे असे होते, विद्यार्थ्यांनी कडेवर घेऊन फिरवलं भर उन्हात तरी देखील ती अत्यंत मजेत, त्यानंतर ग्राउंड वर खाली सोडलं कडेवरून तर एकटी मस्त हिंडत होती, एक्सप्लोर करत करत आपल्या धुंदीत. जितक्या शिताफीने फेटा मिरवला तितक्याच शांतपणे तो काढून ठेवला, फेकला नाही किंवा टोचतोय वगैरे तक्रार तर नाहीच नाही. आई-आई करणं नाही, ओळख लागलीच नाही, ऊन लागतंय म्हणून देखील ब्र शब्द नाही, ३-४ वय वर्ष आणि इतकी समजूतदार भारतीय मुलगी शपथ सांगते पहिल्यांदा अनुभवली. तिच्या सारखी तिचं.
मंगळवार, २१ फेब्रुवारी, २०२३
एक वेगळं रसायन
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा