मंगळवार, २१ फेब्रुवारी, २०२३

१०

महाशिवरात्रीच्या निमित्याने आमच्या घराजवळ भली मोठी यात्रा भरली होती, किंबहुना दर वर्षी भरते. आमच्या भागाचं नावाचं त्या श्री शिवाच्या मंदिरामुळे ठेवण्यात आलं आहे. दर्शन, उपवास, आराधना, प्रसाद ह्या शिवाय येणाऱ्या शिव भक्तांना प्रचंड मोठी पर्वणीच असते. यात्रा म्हटलं म्हणजे लहान मोठ्यांसाठी आकाशपाळणे, विविध प्रकारचे पाळणे, करमणुकीची साधने आणि शिवाय भरपूर खरेदी करण्याची मुभा, हवं ते, इतक्या गोष्टी असतात विकायला कि एका अनुकथेत मांडण्यासारखं नाहीच, ते अनुभवावं तेवढं थोडंच आहे. लाखोंनी भाविक येतात दर्शनाला त्यामुळे आमच्या छोट्याश्या रस्त्यावर पाऊल ठेवायला जागा नसते. त्यामुळे मी अगदी काही अंतरावर गेले, थोडीशी खरेदीची मज्जा लुटली आणि परतले. त्यात एक जोडपं कानातले विकत होते, म्हटलं त्यांना चार पैशाची मदत म्हणून बघू म्हणून गेले आणि प्रेमातच पडले हो.  इतके सुबक सुंदर कानातले होते कि ज्याचं नाव ते. उत्कृष्ट फिरत्या स्टॅन्ड वर मांडलेले असे. पारदर्शक छोटेखानी पिशवीत दिमाखदार पहुडलेले, विचार कराल त्या रंगसंगतीत आणि आकारात उपलब्ध असे. प्रेमात पडावं असंच ते दृश्य आणि अनुभव. मी आधी उचलले भरपूर जोड आणि  त्यानंतर विचारलं किती झाले तर म्हणतात कसे १० रुपयाला एक जोड. मी हादरलेच. कानातले, त्यात रंगबिरंगी खडा किंवा तत्सम वस्तू, ते एका पुठयावर लावलेले, मग त्यावर प्लास्टिक ची पिशवी, किंचितसा का होईना त्यांचा फायदा आणि फक्त १० रुपये. हे समीकरण माझ्या विचारा पल्याड आहे, पूर्णपणे. कसं शक्य आहे हे आणि लुकूपुकू किंवा लवचिक, न घालता येणारे असे नाहीत हो, मस्त, छान कानातले. इतक्या उड्या पडत होत्या न त्या कानातल्यांवर आणि खरंच छान आहेत, नवीन फॅशन ला धरून, फार मोठे नाहीत, फार लहान नाहीत, एकदम झकास असे. लोकं पटापटा घेत होते आणि ते जोडपं त्याच वायुवेगाने पुन्हा नवनवीन जोड त्या स्टँडला लावत होती, भर घालत होती. 

मी मागे  एकदा लिहिल्या प्रमाणे "क्लासेस vs मासेस" हा एकतर फंडा असावा नाहीतर खरी किंमत इतकी कमी म्हणजे कमाल आहे. जुना माल पण नाही हो, कि खपवायला इतकी कमी किंमत ठेवली आहे ते.  अगदी फ्रेश जोड ते, पाहता क्षणी घ्यावे असे. 

ह्या सगळ्या फंदात न पडता मी ते घालून मिरवणं जास्त पसंद करेन.  मनात सहज विचार आला म्हणून हा पंक्ती प्रपंच. 

फक्त १० रुपयाला आहेत म्हणून का घ्यायचे, का घालायचे? असे प्रश्न माझ्या मनाला शिवले देखील नाहीत. कानांना सगळ्या प्रकारच्या कानातल्यांची सवय असावी. किंमतीचा आणि तुमच्या वयाचा, हुद्द्याचा, मानाचा आणि इतर कशाचाही संबंध नाही माझ्यामते. आधी म्हटल्या प्रमाणे, त्या कष्टकऱ्या जोडप्याला मदत हि निखळ भावना. ज्या सगळ्या कष्टकर्यांचे हात लागले आहेत हि कानातली तय्यार करायला, माझ्या फक्त सौंदर्यात नाही तर ताजतवानं राहण्यात भर पडली आहे त्यामुळे, त्यांना मनापासून नमन. असेच वैविध्य कलाकृती घडो सातत्याने तुमच्या हातून हि प्रार्थना. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...