गुरुवार, २३ फेब्रुवारी, २०२३

दाग अच्छे है-३

मी मागे एकदा लिहिल्याप्रमाणे "धक धक वाढते ठोक्यात..." ह्या सदराअंतर्गत, मागल्या महिन्यात अचानक मला मला हृदय नावाचा अवयव आहे हे पहिल्यांदा ध्यानात आलं. सातत्याने आणि जलद गतीने तो धडधडत होता कि मी सोडून सगळेच पार घाबरले. तज्ज्ञांनी वैविध्य अश्या हृदयाशी निगडित चाचण्या करायला सांगितल्या, पडत्या फळाची आज्ञा जशी आम्ही त्या केल्या आणि तदनंतर त्याच दिग्गज डॉक्टरांना लक्षात आलं कि हे रसायन जरा वेगळं आहे. रसायन म्हणजे माझं हृदय आणि मी दोघी हो. त्यामुळे मला अजून एक चाचणी करून ताबडतोब एक इंजेक्शन घ्यायला लावलं. पण ते इंजेक्शन म्हणजे सर्वांना अनुकूल ठरत नाही, किंवा काही तरी विरोधी प्रतिक्रिया होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हे इंजेक्शन हळुवारपणे IV / अंतर्बाह्य ठिबक पद्धतीने हळुवारच दिलं जातं किंवा द्यावं. पण तत्पूर्वी एक छोटेखानी प्रयोग परीक्षा घेतली जाते. काही अंश त्या औषधाचा मनगटाच्या थोडं पुढे इंजेक्ट केला जातो, अर्धातास रुग्णाला थांबवून ठेवतात आणि  त्या कडे बारीक लक्ष ठेवले जाते. काही प्रतिक्रिया किंवा बदल जाणवले नाही तर आणि तरच संपूर्ण इंजेक्शन दिले जाते रितसर, रुग्णाला ऍडमिट करून वगैरे.  मनगटाच्या खालच्या आतल्या भागात जे आधी इंजेक्ट करतात ते खूप विचित्र वेदनादायी असतं कारण  जागा थोडीशी जास्त नाजूक असते, खूप मास नसतं. मला संपूर्ण इंजेक्शन घेतल्यावर आता सध्या खूप आल्हाददायी, ताकदवर, वेदनाविरहित आणि उत्साही वाटत असलं तरी देखील दिवसेंदिवस मला एक बदल जाणवू लागला तो म्हणजे हातावर एक डाग दर दिवशी कलेकलेने वाढू लागला आणि तो जास्त गडद पण होऊ  नक्की काय होतंय? तेव्हा लक्षात आलं कि हा सातत्याने नजरेस पडणारा इंजेक्शन ज्या ठिकाणी दिलं तो डाग मला आठवण करून देतो आहे, लक्ष वेधून घेतो आहे कि तू हे इंजेक्शन घेतल्यावर मस्त ठणठणीत बरी झाली आहेस. काही टक्के उरलं सुरलं असेल तर ते देखील लवकरचं मुळापासून निघून जाईल ई. त्यामुळेच पुन्हा एकदा म्हणते आहे कि "दाग अच्छे है". जरासं किंचित कधी जरी मनात त्या डागाला बघून वाटलंच तर अजून एक लक्षात येतं कि आत्ता पर्यंत अगदी निखळ कातडी अनुभवी कि इतकी वर्ष मग आता काही चांगला बदल नको? टॅटू वगैरे अनैसर्गिक काही करून घ्यायची गरजच नाही, अगदी मस्त परस्पर विरोधी रंगछटा आपोआप कोरल्या गेल्या आहेत, अजून काय पाहिजे. मस्तच वाटतंय सर्वार्थाने मला. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...