अगदी फेब्रुवारीतच उन्हाने जीव नकोसा झालायं, दुपारी उन्हात बाहेर पाऊल पडलं तर संपलं. मग विचार करा ऐन उन्हाळ्यात काय होणार? कित्ती वाढणार तापमान? माणसं, प्राणी, पक्षी अगदी सगळेच जीव होरपळून निघतात. गाड्या उन्हात उभ्या राहून तापतात आणि प्रत्येक ठिकाण अगदी भट्टी सारखं भासतं.
मूळ मुद्दा हा आहे कि हि बरीचशी दुकानं खाण्याचीच आहेत. त्यात सध्या इडली ला भारी दिवस आलेत, उठ सुठ सर्वत्र फक्त इडलीचीच दुकाने. बाप रे. फक्त कल्पना करा मंडळी इडलीचं पीठ फ़सफ़सलेलं असतं किंवा लागतं अगदी नरम इडली होण्याकरता. ते पीठ प्रक्रिया केलेलं असतं, एक दिवस आणि रात्र भिजलेलं. मग अश्या अवस्थेतील पीठ, त्यात ऊन म्हणतंय मी आणि पत्रे + गॅस ची धग, अहो काय? काय पोटात जातंय तुमच्या? लक्षात घ्या कृपया. त्या पेक्षा जमल्यास घरची भाजी भाकरी परवडली हो. अगदीच पर्याय नसेल तर आणि तरच जा अश्या ठिकाणी, नाहीतर टाळा मंडळी, घरचं ते घरचंच, अगदी सोनं किंवा त्या पेक्षा भारी / उजवं / उपयोगी / पौष्टिक. "हेल्थ इज वेल्थ" मंडळी. कृपया सांभाळा स्वतःच्या प्रकृतीला. बाहेर गावाहून बदली हुन आलेले, घर लागेपर्यंत सोय म्हणून, एकटे आजी-आजोबा मावशी आल्या नाही तर किंवा आजीनं काही आणीबाणीच्या वेळा ठीक आहे पण सातत्याने खाणाऱ्यानो सावध व्हा. कोणालाही कधीही कुठलीही प्रकृतीची तक्रार यायला नकोच पण आलीच तर मग मूळ शोधून काढणं फार अवघड जातं आणि त्यामुळे मग योग्य उपचार मिळत नाही, डॉक्टरच्या आणि रुग्णाच्या तोंडाला फेस येतो. थेंबे थेंबे तळे साचे. जागे व्हा. घरचं खा. स्वतः करा पण बाहेरचं टाळा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा