माझ्या मराठीच्या आकलना प्रमाणे वडिल ह्याचं मूळ वडाच्या झाडाशी असावं. जसा वड वृक्ष आणि त्याचे अगणित गुणधर्म अगदी तसेच किंबहुना कणभर जास्त म्हणजे वडिल, संपूर्ण कुटुंबाचे छत्र.
माझे
वडिल म्हणजे माझ्यासाठी अक्षरशः एक मूर्त विद्यापीठाचं
जणू. त्याची कारणे असंख्य आहेत, जागोजागी, वेळोवेळी त्यांनी केलेली मदत, सुचवलेले पर्याय,
दाखवलेली दिशा आणि सातत्याने
दर्शविलेले प्रतिबंधात्मक तरणोपाय. मराठी, इंग्लिश, हिंदी भाषेवर प्रचंड प्रभुत्व, म्हणींचा चपराख प्रयोग आणि शाब्दिक फोड
/ जोड करून उद्बोधक विचार,
अहाहाच. जगापल्याड असे.
तीन
"म" माझ्या पुढ्यात उभे ठाकले इंग्लिश
मधले मनी, म्यारेज का
M.Tech. माझी नोकरी अर्थार्जन सुरु होते, त्यावेळी
लग्नाचे वय झाले होते
आणि पुढील शिक्षण पण महत्वाचे होते.
M.Tech च्या प्रवेश परीक्षेत मी भारतात पहिली
आले होते. प्रवेश घेतला तर नोकरी सोडावी
लागणार होती आणि लग्न
पण कदाचित ठरलं तर लांबणीवर
टाकावं लागणार होतं. बाबांना विचारल्यावर म्हणतात कसे, "सोप्पं आहे, जे सध्या
हातात आहे, भविष्यात उपयोगी
आहे ते कर, बाकीच्यांचा
विचार देखील नको". मी मग पुढील
शिक्षणाला प्राध्यान दिले.
माझी
जुळी बाळं लहान होती
तेव्हा, नोकरीच्या ठिकाणी काही अडचणी आल्या
तर, काही तब्बेतीच्या तक्रारी
असल्या तर, पैशावरून काही,
असं जर बाबांच्या पुढे
मांडल तर उत्तर मिळायचं
"काळजी करू नये, त्यापेक्षा
ईच्छाशक्ती, सामर्थ्य, वैविध्य स्थरावरील कामे करून स्वतःला
इतकं शक्तिशाली घडव कि काळाने
जी-जी करत तुमच्या
समोर उभं ठाकलं आणि
विचारलं पाहिजे कि बोल मी
कुठल्या दिशेने नेऊ तुला".
अंग
गरम वाटलं, ताप आल्यासारखा वाटलं
आणि त्यांना सांगितलं तर म्हणत असत
"तापच आला आहे ना,
गोळी घे जाईल निघून,
पण लक्षात ठेव सं-ताप
कधीही येऊ देऊ नको
त्या करता साधी गोळी
घे आणि निघून जाईल
असा उपाय नाही".
त्यांच्या
सातत्याने काम, कष्ट, विविध्य
धाटणीतले उत्कृष्ट विचार, आणि अश्या असंख्य
गुणांनी मीच नाही खूप
जणांना शिकता आलं ते नेहेमी
म्हणायचे "तुमचं काम बोललं पाहिजे
तुम्ही नाही". पुढ्यात
मांडलेलं प्रत्येक आव्हान स्वीकारायचंच. हे जमेल कि
नाही ह्यात वेळ आणि शक्ती
वाया घालवण्या पेक्षा करून बघायचं, जमतं.
"केल्याने होत आहे रे...".
माझे बाबा मला मुलापेक्षा
वरताण म्हणायचे नाही तर तसं
घडवलं. बँकेत
आवर्जून घेऊन जायचे, व्यवहार,
फॉर्म भरणे समजावून सांगायचे
आणि त्यांची कामे होईस्तोवर मला
बँकेत आलेल्या ज्यांना लिहिता-वाचता येत नाही अश्यांची
मदत करायला लावायचे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा