अगदी असं काहीस झालं मला आज, अचानक आणि स्वर्ग फक्त चार बोटे दूर आहे असं जाणवून गेलं. माझ्या सारख्या अनुकथा मांडणारीला एक भला मोठा पुष्पगुच्छ देण्यात आला. खूप सुखद अनुभव होता, आश्चर्य आणि सरप्राईझ देऊन गेला. इतक्या पट्टाकिनी एकटा अनोखा सुगंध देणारा तो पुष्प गुच्छ अप्रतिम आहे. वैविध्य टपोरे देशी गुलाब आहेत, किंबहुना त्या भल्यामोठ्या आकाराच्या गुलाब फुलांच्या कळ्या आहेत, शिवाय पांढरी निळी फुले आहेत, हिरवीगार पाने आणि मस्त विणलेली बास्केट ज्यात हे सगळं सुबकतेने मांडले आहे. "चेरी ऑन केक" म्हणजे ह्या पुष्प गुच्छात अनेकविध छटांनी बहरलेली आकाशी निळसर फुले आहेत, जिच्या तळातल्या मोठ्या पाकळ्या पांढऱ्या शुभ्र आहेत. पाहताक्षणी मोहून टाकेल असा तो. नीट निरीक्षण केलं माझ्या चार डोळ्यांनी तेव्हा उमगलं कि तो पुष्पगुच्छ तय्यार करणारा नक्की एक अवलिया आहे कारण त्याने अधले-मधले काही फुलं मूळची पांढरी राखून बाकीच्यांवर निळ्या रंगाची बौछार केली आहे. "काय वर्णू तव गूण अल्पमती नारायण" अशी माझी अवस्था झाली ती एकंदरीत मांडणी बघून. अहाहा च. इतके माझ्या साठी,वा च. जणू काही त्याला समजले कि मी येणार, माझे स्वागत वरिष्ठांच्या हातून होणार आणि माझ्या हाती रंगांची + अनुभवनाची बरसात होणार. क्या बात है.
सगळ्या जेष्ठ शिक्षकांनी, अधिकाऱ्यांनी, विभाग प्रमुखांनी त्यांचा बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल शतशः धन्यवाद सर्वांना. सगळ्यांच्या उपस्थितीमुळे, आणि थोडक्यात केलेल्या चर्चेमुळे मला जणूकाही गोष्टीरूप गुच्छ अनुभवायला मिळाला, "अवघा रंग एक झाला..." असे झाले.
छानच लिहिलं आहेस.प्रसंग कुठला? काल्पनिक असो की वास्तवातला,तो वर्णनाशी जोडला जायला हवा
उत्तर द्याहटवा