कुठलेही काम किंवा धंदा सोप्पा नाहीच. प्रत्येक ठिकाणी आव्हानं आहेतच, मग तुम्ही कितीही मोठे व्हा. प्रत्येक गिऱ्हाईक नवीन प्रेरणा आणि मागण्या घेऊन येतोच. त्याला पूर्ण करणे इतके सोप्पे नसतेच मुळी. पण अनेक वर्षांच्या अभ्यासामुळे गिऱ्हाईक आला कि त्याची बोली भाषा, शारीरिक ठेवणं, किंवा हावभाव ह्या सर्वांवरुनच समजत असणार कि हे फक्त वेळ काढू पणा करायला आले आहेत, कि बघायला आले आहे, चाचपडायला किंवा खरंच घ्यायला. फक्त मालकंच नव्हे तर मुरलेला दुकानात काम करणारा पण ओळखत असावा नक्कीच. त्या नुसार मग कित्ती वेळ द्यायचा, काय काय दाखवायचे, कोणी दाखवायचे हे ठरत असणारच. गळ्यात मारायची खुबी जमली पाहिजेच. समोरच्याच्या स्वभावानुसार विविध क्लुप्त्या वापरून त्यांना आनंदाने हाताळणे अत्यावश्यकच आहे. सरते शेवटी अतिथी देवो भव! नाही का? माणूस ओळखता आला पाहिजे, माणूस हाताळता आलाच पाहिजे, बॉडी लँग्वेज वाचता आली पाहिजे, खर्च किती करणार आहेत ह्याचा अंदाज बांधता आला पाहिजे, किती वेळ घेणार का पट्टाकिनी घेऊन मोकळे होणार हे देखील समजले पाहिजे, पुन्हा घेतलेले परत करायला येणार का? हे दिसलं पाहिजे त्यांच्या चालीत आणि असे बरेच काही. एकंदरीत काय एका वेगळ्या प्रकारे गिऱ्हाईकी काय कशी होणार हे जाणवलं पाहिजे. कित्ती प्रकारची माणसे सांभाळतात नाही हे व्यापारी? देवा, कमाल कमाल च आहे सर्वांची.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा