वेळेचा सदुपयोग म्हणून नवनवीन चित्रपट बघणे, किंवा सुंदर पटकथा असलेले एन्जॉय करणे, किंवा माझ्या लेकीच्या आवडीची एखादी कलाकृती बघणे हा आमचा सध्याचा नित्यक्रम झालेला आहे. इतक्या नित्यनेमाने मी ह्या आधी कधीच एवढे चित्रपट बघितले नाहीत, किंबहुना मी कधी एवढ्या कलाकृती बघीन एका जागी बसून हे ध्यानी मनी पण नव्हते. पण आता सुदिन आलेत, त्यामुळे मग बघणं होतं जे आम्ही दोघी जगावेगळ्या पद्धतीने अनुभवतो, एन्जॉय करतोच. त्यातलाच हा एक. एक अट होती कि कुठलेही मत आधी वाचायचे नाही, टीझर, स्पॉइलेर, किंवा अजून काहीही बघायचे नाहीच, थेट अनुभव घ्यायचा. बास. बसलो कि मग दोघी आवरुन. सगळेच कलाकार मंडळी आमच्या दोघींची अत्यंत प्रिय, त्यात दोघींना प्रचंड मराठीची आवड, अजून काय लागतंय. सुरु झाला चित्रपट. आधी वाटलं काय, माझ्या लेकीच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं कि बाकी ढीगभर पिक्चर सारखाच हा एक आहे, मम्माने म्हटलं म्हणून फक्त बघायचं ठरवलं, किंवा तिला कंपनी द्यायची, बास. मला पण मग जाम टेन्शन आलंच. पण छे हो, आमच्या दोघींचे डोळे कधी पाणावले कळलंच नाही. अप्रतिम मोड आला आणि सार्थक झाल्यासारखं वाटलं. सुंदर जमलंय मेतकूट एकंदरीत, खरंच, ज्याने हा विषय सर्वप्रथम निवडला त्याला साष्टांग नमन. खूपच साधा, पण मनाला भिडणारा असा. क्या बात है? फक्त एका दिवसात घडणाऱ्या घटना, दिग्गज कलाकारांचा अभिनय, पुणे, आणि साधलेला शेवट. धन्यवाद. असेच अनेक, असंख्य चित्रपट नेहेमी घेऊन या, आम्हाला आवडेल बघायला. अर्थात हि निश्चितच खरी गोष्ट वाटली, ज्यावर आधारित हि कलाकृती सादर केली संपूर्ण चमूने. समाजाचे हे रूप बघून नक्कीच भारावल्या गेलो आम्ही दोघी, निःशब्द झालो, इतक्या उशिरा का बघितला हा चित्रपट असे देखील जाणवले. त्यामुळे सर्व मित्रमंडळींना विनंती आहे कि एकदा तरी वेळ काढून, मोबाईल बाजूला ठेवून, नक्कीच हि निर्मती बघा. आवडेल तुम्हाला, बरेच काही देऊन जाईल हि मांडणी सर्वांना.
मला आणि माझ्या ह्या पिढीतल्या लेकीला असं वाटायचं कि आम्ही दोघीनी बसून एकत्र बघण्यासारखे चित्रपट नसावेत, पण हॅशटॅग तदेव लग्नम् ते खोडून काढले मुळापासून.
मला विचाराल तर ह्या अश्या सध्या आम्ही दोघी ज्या आठवणींचे पूल बांधतो आहे ना, ते आम्हाला बरेच दूर घेऊन जातील, अनेक वर्ष साथ देतील ह्यात काही शंकाच नाही. धन्यवाद इतकी साधी, पण अप्रतिम मैफिल तय्यार केल्याबद्दल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा