आता थोरला बंधू एकटा आहे, आई वडिल दुसऱ्या जगात स्थायिक झाल्यावर. त्यात मोठ्या आजारपणातून उठल्यावर लहान बहिण म्हणून कर्तव्यच आहे. आई वडिलांचे सासरी आल्यापासून काहीही करणे जमले नाही. अनेक प्रसंग आले पण मुलं, घर, नोकरी ह्याला प्राधान्य दिलं गेलं, कळत - नकळत. पण आता घालमेल नाहीच, सगळं काळं पांढरं, ग्रे नाहीच ठेवलं त्याने. त्यामुळे पटापट सगळं घडवून आणलं आणि मार्गी लावलं. हो ह्या मधे मुलं नोकरी व्यवसाय, यजमान त्यांचं क्षेत्र आणि थोरले घरचे सांभाळणे करतात आहे. दोघांना जसे काही वाटून दिले आहे काम, त्यांच्या त्यांच्या वाटचं. आणि हे सर्व चांगल्याच साठी घडवून आणलं आहे हे निश्चित. तो सर्वांचा मायबाप, भाऊबंधू तो का वाईट करणार? छे छे मुळीच नाही आणि कधीही नाहीच. त्यामुळे शांतपणे तो दाखवतो आहे त्या वाटेवर चालणे आणि पुढे जाणे, किंबहुना आपण चालू पण शकत नाही त्याच्या मर्जीशिवाय. त्यामुळे ठेविले अनंते...
हा दृष्टिकोन सर्वसामांन्यच्या लक्षात येणार नाही, त्यामुळे काहीच सांगत बसू नये. शांत राहणे, पुढे जाणे, नामस्मरण करणे जास्त योग्य.
किती जणं आहेत आणि होते त्यावेळी आजूबाजूला, प्रेम करणारे, जीव देणारे, आस्था असलेले, आदर असलेले, आणि बऱ्याच वयोगटातले. पण कोणाशीच बोलावेसे वाटले नाही, कोणालाच काही सांगावेसे वाटले नाही. कदाचित त्या सर्व मित्र, मैत्रिणी, आप्तेष्ट ह्यांच्या कडून मार्ग निघाला असता, कारण त्यांना अनुभव पाठीशी आहे. पण ते होणे नव्हते, ग्रे अर्धशंकू राहणे मान्यच नव्हते आता त्याला, त्यामुळे त्याला माझ्यासाठी इतके कष्ट घ्यावे लागले. मनापासून आभार, धन्यवाद. हा दृष्टिकोन देखील योग्य वेळी च दिला, आधी नाही. आधी फक्त धडपड करून घेतली, नवीन जागी बीजारोपण केले आणि मग सुचवले. निःशब्द झाले मी पूर्णपणे. अजून काय करायचं त्याने. कमाल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा