मुख्यतः गेली दोन वर्षे आणि त्या आधीची काही अशी मिळून अनेक वर्ष मी एका प्रश्नाचे उत्तर आतुरतेने शोधतं होते. मी अनेक मैत्रिणींना विचारले, नातेवाईक झाले, वयाने आणि मानाने मोठ्या असलेल्या व्यक्ती झाल्या, विविध स्तरावरच्या लोकांशी चर्चा केली, समुपदेशकांना विचारले, पैसे देऊन उत्तर मिळवण्याचा अथक प्रयत्न केला आणि आज अचानक ते हवं असलेलं उत्तर मला मिळालं. मला जसे कि कोणी तरी कानात येऊन सांगितले किंवा मला तसा भास झाला असं म्हणायला हरकत नाही. मी एक फक्त गृहिणी म्ह्णून जगले असते तर मला खूप खूप वेळ माझ्या मुलांसोबत मिळाला असता, अगणित आठवणी जमा झाल्या असत्या. आता मला काहीच आठवणींनी इतके दुःख होते, आता मुलं लांब गेली आहेत त्यामुळे जर जास्त आठवणी साठल्या असत्या तर जास्त प्रमाणात दुःख झाले असते त्यांच्या नसण्याचे. शिवाय अगदी खारीचा वाटा असे मी कधीतरी त्यांना पैसे पाठवू शकते ते कदाचित पाठवता आले नसते. मला माझं विल करता आलं नसतं कारण माझ्या नावावर असं काहीच नसतं. हि दिलेली जी पुंजी आहे ती तशीच राहून फक्त इंटरेस्ट वर जर मला शेवट पर्यंत निभावता आलं तर हि एक भेट असू शकेल मुलांसाठी. माझा मूळ स्वभाव जाणून, किंवा भविष्यात काय लिहिलंय माझ्या स्क्रिप्ट मधे हे ठाऊक असल्यामुळे माझ्या भावनिक गुंतवणुकीला सांभाळण्यासाठी नोकरीची वाट दाखवली गेली, त्या मार्गावर मला नेलं आणि चालवलं देखील. कदाचित ह्या मुळे मुलं थोडीशी धीट झाली असतील, विद्यार्थ्यांना काही चांगलं ऐकायला मिळालं असेल, अनेक सहकाऱ्यांना काही समजलं / उमगलं असेल, मी तर निश्चितच एक वेगळी व्यक्ती म्हणून घडले आणि घडते आहे अजून देखील. जे होतं ते चांगल्यासाठीच हे माझ्या गुरु असंख्य वेळा सांगत होत्या, ते पटत पण होतं, मागे जाऊ शकत नाही हे उमगत पण होतं, आज महत्वाचा आहे हे जाणवलं होतं पण तरी भूतकाळातचं फेरफटका मारला जायचा. आता हे थांबेल हे निश्चित. असो. जे आहे ते असं आहे, मी अशी आहे, माझ्या हातून असं घडलं आणि मागे कोणीच जाऊ शकलं नाही, शकणार नाही, त्या पेक्षा इतकं सगळं सुंदर आहे आजूबाजूला ते बघू या, अनुभवुया आणि नतमस्तक होऊन त्याने आखलेल्या मार्गावर त्याच्यासोबत जाऊ या. पुढील परिक्रमा निश्चितच सर्वोत्तम आहे हे नक्की.
शुक्रवार, ३० जानेवारी, २०२६
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा