मी आत्तापर्यंत बरेच जणं पहिले आहेत पण आज पुन्हा एकदा बघण्यात आले म्हणून लिहावसं वाटलं. केस पांढरे व्हायला लागले कि काळा रंग लावण्याची पद्धत आहे, अर्थात तरुण दिसण्यासाठी, वय लपवण्यासाठी, सोय आहे म्हणून, फॅशन म्हणून, लोक म्हणतात / सांगतात म्हणून, लोक काय म्हणतील म्हणून आणि अनेक वर्ष त्या रंगाची सवय झाली असते म्हणून. तर काही महानुभव असे आढळले कि ज्यांची त्यांच्या मिशीवर देखील ताव मारला होता, रंगवली होती. अर्थात मिशी त्यांची,पैसे त्यांचे, मेहेनत त्यांची, इच्छा पण त्यांचीच असो. हेच ते महानुभव जे उठसुठ येणा जाणाऱ्यांना लांबलचक सल्ले देत असतातच, त्यात कधीच ते मागे नसतात, जसे कि हे त्यांचे आदी कर्तव्यच आहे किंबहुना त्यांना सगळे समजते, त्यांनी जास्त पावसाळे बघितले आहेत, प्रचंड अनुभव गाठीशी आहे आणि अशी इतर अनेक कारणे आहेतच. अनेक पावसाळे आणि पांढरे केस म्हणजे वयस्क किंवा प्रगल्भ, जेष्ठ ई. नाही का? माझ्यामते एक काहीतरी निवडा मंडळी, मिशीवरचा ताव किंवा जिभेवरचा ताबा. दोन्ही कसे चालेल? एक पवित्रा निवडा? एक पात्र व्यवस्थित सादर करा, जेष्ठ समजत असाल तर ते तुमच्या वर्तवणुकीतून दिसू दे, बाता मारण्यातून नाही, वायफळ सल्ले देण्यातून नाहीच नाही, विचारले तर निश्चित मदत करा पण वेळ जावा म्हणून नाही, किंबहुना तो सत्कारणी लावा. अहो इतकी वर्षे तो काळा रंग जपलाय ना? (त्यांनी तुम्हाला जपलंय बरं का हे ध्यानात ठेवा), मग आता तो निखळ पांढरा रंग परिधान करून तर बघा बदल दिसेल, घडेल आणि हो तुम्हाला कदाचित बदलायला भाग पाडेल, अर्थात हे सगळं फारच वयक्तिकच आहे, मी फक्त इथे माझे निरीक्षण मांडले आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा