“का?” हा प्रश्न मी फारसा कधी विचारलाच नाही.
मोठ्यांनी सांगितलेलं ऐकलं, आणि तसं जगण्याचा प्रयत्न केला.
“लवकर निजे, लवकर उठे…”
“पहाटेची वेळ साधनेसाठी उत्तम…”
हे सगळं मान्य होतं.
पण त्यामागचं खरं कारण अलीकडे उमगायला लागलं.
एक वेळ अशी होती, जेव्हा दिवसाची सुरुवात आणि शेवट याला एक ठराविक ताल होता.
पहाट म्हणजे खरोखरच शांतता निखळ, निर्विघ्न.
ना गोंगाट,
ना सततची धावपळ,
ना मन विचलित करणारा बाह्य आवाज.
अशा वेळी प्रार्थना, साधना,
वादक-गायकांचा रियाज, नर्तकांची तयारी, खेळाडूंचा सराव, योगाभ्यास ...
हे सगळं अधिक स्पष्ट, अधिक केंद्रित होत असे.
आणि कदाचित म्हणूनच,
त्या प्रयत्नांना सामूहिक बळ मिळत असे.
जणू अनेक जण वेगवेगळ्या मार्गांनी चाललेत,
पण उर्जा एकाच दिशेने वाहते आहे.
आज चित्र वेगळं आहे.
वेग वाढलाय, शांतता विरळ झाली आहे.
तरीही
आपण जे काही करतो, विचारतो, साधतो…
ते जर व्यापक भल्यासाठी असेल,
तर त्याचा परिणाम होणारच.
थोडा उशीर होईल कदाचित,
पण योग्य भावना आपला मार्ग शोधतातच.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा