जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या प्रिय व्यक्तीसाठी हिरे खरेदी करते, तेव्हा खरा हिरा कोण असतो?
तो का, ज्याच्याकडे सहजपणे, प्रेमाने खरेदी करण्याची क्षमता आहे?
की तो, ज्यासाठी हे हिरे निवडले गेले आहेत, जो खरोखरच त्यासाठी पात्र आहे?
की ती संपूर्ण प्रक्रिया, जिथे भावना, योग्य वेळ, उपलब्धता आणि काहीही अपेक्षा न ठेवता देण्याची तयारी एकत्र येते?
की मग तो हिराच, जो शांतपणे दुकानातून निघून, त्या कष्टाळू आणि सुंदर हातांपर्यंत पोहोचतो?
विचार करता करता असं जाणवतं, यापैकी कुणीच एकटं पूर्ण नाही.
काहीतरी अधिक मोठं आहे, जे सगळं घडवतं, जुळवतं आणि प्रत्येक टप्प्यावर आशीर्वाद देतं.
तो अदृश्य "तो"च खरा हिरा आहे.
तो आधीही होता आणि पुढेही राहणार आहे.
एक विचार, जो मनात आला आणि म्हणून इथे मांडला?
तुमचं मत नक्कीच जाणून घ्यायला आवडेल मला ह्या बद्दल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा