हल्ली दिवसातून सिगारेटच्या धुराच्या किमान चार फेऱ्या ठरलेल्या असतात. आणि हल्ली तर सिगारेटच्या दुनियेतही काहीतरी बदल झालाय बहुतेक. धूर जास्त दाट, जड आणि टिकाऊ झाल्यासारखा वाटतो. एकदा आला की बराच वेळ सोबत राहतो. त्यामुळे परिणामही जास्त वेळ जाणवत राहतो.
माझा बहुतेक वेळ वाचन, लेखन, अभ्यास साहित्य तयार करणं, ब्लॉगिंग, ऑनलाईन शिकवणं, journaling अशा अनेक गोष्टींमध्ये जातो. माझ्या बेडरूमला मोठ्ठं बाल्कनीचं दार आहे. भरपूर प्रकाश, मस्त हवा आणि अप्रतिम cross ventilation. माझं ते कोपऱ्यातलं विश्व मला फार आवडतं.
पण हल्ली त्या cross ventilation सोबत bonus म्हणून अजून काहीतरी येतं.
माझ्या डोक्यावर अगदी थेट वर राहणारे शेजारी बहुतेक WFH चा आनंद घेत असावेत. कारण त्यांचा बराच वेळ बाल्कनीत जातो. आणि ते chronic smoker आहेत हे तर आता निर्विवाद झालंय. आमच्या बाल्कनी इतक्या जवळ आहेत की दिवसातून अनेकदा त्यांचा धूर थेट माझ्याकडे येतो.
बराच काळ मला एकच प्रश्न पडतोय. मी किती वेळ माझंच बाल्कनीचं दार बंद ठेवू? आणि का? दुसऱ्याच्या सवयीमुळे मी नैसर्गिक प्रकाश, हवा आणि माझं आवडतं workspace का टाळावं?
विशेष म्हणजे वास इतका त्रासदायक नाही वाटत. पण second-hand smoke बद्दल जे काही ऐकलंय, वाचलंय, त्याचे परिणाम मात्र सतत मनात फिरत राहतात.
मनापासून वाटतं, अशा धुराला दुसऱ्यांच्या फुफ्फुसांपर्यंत पोचायच्या आधीच शोषून घेईल असं एखादं साधन असावं.
शेजाऱ्यांना जाऊन सांगावं असं वाटतंय खरं. पण त्यातून फार काही बदल होईल असं वाटत नाही. त्यापेक्षा असं एखादं smoke absorption device शोधून त्यांनाच भेट द्यावं बहुतेक.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा