जेव्हा पासून भारतात / पुण्यात मोबाइल नावाचा अवयव आलाय तेव्हा पासून मी एक गोष्ट अनुभवली आहे. नेहेमीच हे होत नाही, पण बरेचदा होत, म्हणजे माझ्या सोबत तर इतक्यांदा झालाय कि त्यातून मला आता काही तरी शिकायला पाहिजे.
माझी एक सवय आहे, माझ्याकडे केवळ कोणाचा फोन नंबर आहे म्हणजे मी त्यांना कधीही फोन करत नाही, आधी विचारते, कारण कधी कोणी गाडी चालवत असत, कोणी मीटिंग मध्ये असतात तर कोणी अजून काही महत्वच्या कामात. त्यामुळे जेव्हा मला कळत कि समोरचा व्यक्ती थोडा मोकळा आहे, बोलू शकतो, तरच मी फोन करते. पण तरीही बरेचदा मी जेव्हा जेव्हा फोन करते तेव्हा तेव्हा काही जण इतका आवाज करतात मागे, एक तर दूरसंचार चालू असतो, भांड्यांचा तर इतका खडखडाट ऐकू येतो कि असं वाटत का केला मी फोन जेव्हा कि समोरची व्यक्ती फारच कामात आहे. बरं मी काही रोज रोज फोन करते असही नाही. काय हरकत आहे जर शांत पणे बोललं तर, प्रत्येक वेळा multitasking केलच पाहिजे का?
माझ्या फोन
मध्ये असं
काही सेटिंग पाहिजे कि ज्यामुळे मला फक्त त्या व्यक्तीचाच आवाज ऐकू येईल, बॅकग्राऊंड चा नाही. शोधते शोधते...
Wrote this on FB Timeline on 22nd July 2019. And from past few days / months a specialized headsets are available in the market which truncate surround sounds, they are really costly but useful.