शनिवार, २० फेब्रुवारी, २०२१

विळी ते चाकू प्रवास...


माझ्या लहानपणी माझ्या घरी आई फक्त विळी वापरत असे भाजी चिरायला. आमच्याकडे आईच्या शिस्तीप्रमाणे दोन विळ्या होत्या, एक कांदा चिरण्यासाठी आणि दुसरी फळे अथवा भाज्या. कितीही धुवून घेतली तरी तीच नाव कांद्याची विळी असच होत. आम्हाला त्या विळ्यांचीच इतकी सवय होती कि सहज वापरली जायची जमिनीवर बसून, किंवा ओट्यावर उभे राहून. चिरणे / कापणे ह्या व्यतिरिक्त नारळ खवण्याला पण हीच विळी उपयोगी पडायची. अधेमधे तिचा स्क्रू ढिला व्हायचा, पण ते सोप्प होत नीट करायला. धार लावणारा पण येत असे दारावर. एकंदरीत काय तर विळी हि एकदा घेतली कि अनेक वर्ष चालत असे. पण त्यानंतर मी हैद्राबाद ला आले उच्च शिक्षणासाठी, मग लग्न, आणि त्यानंतर माझा चाकुशी संबंध आला ते आज तागायत. विळी फक्त स्मरणातच राहिली. सवय नसल्यामुळे आधी हाताळायला जमायचाच नाही हा चाकू, कारण सोप्प आहे. माझ्या साठी प्रवास हा विळी ते चाकू फक्त एवढाच मर्यादित नव्हता तर "ती ते तो", "आडवे ते उभे", "दोन्ही ते एक हात वापर" हा असा होता. खैर आता "त्याची" सवयच झाली आहे कारण अनेक प्रकारचे चाकू वापरावे लागत आहेत, लोणी लावण्याचा, केक कापायचा (हे झाले बोथट प्रकारचे), नेहेमीच्या भाज्या, फळ ई. साठीचा, आणि मोठ्या आकाराचे सुद्धा.  आता तर नारळ खवण्याला एक छोटसे उपकरण मिळते, त्यामुळे विळीच्या त्या डोक्याच्या भागाची गरज नाही, किंबहुना खोवलेला नारळ देखील विकत मिळतो. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...