शनिवार, २० फेब्रुवारी, २०२१

Importance of home-cooked food = महत्व घरच्या खाण्याचं...

ह्या मागील ७-८ महिन्यात आपल्याला घरच्या खाण्याचं महत्व अधिकच पटलं असेल आधी पेक्षा. आणि घरच्या खाण्याची चव, स्वच्छता, आपुलकेपणा ई. इतर कुठेही मिळणं अवघडच आहे. नाही का? अनेक आधुनिक संत सतत सांगतांना मी ऐकलं आहे, आणि त्यांनी बरेचदा बाहेरच्या मोठ्या उपहारगृहाचे उदाहरण दिले आहे. समजा एक कुटुंब उपहारगृहात खायला गेलं, त्यांनी आपले आवडीचे पदार्थ मागवले, वाढप्यानी ते आणले, पण त्याच्या किंवा खाणं तय्यार करणाऱ्याच्या मनात आलं कि मला हि हवे हे खायला तर त्याचा परिणाम होतो, ते पदार्थ ग्रहण करणाऱ्यावर, नक्कीच. म्हणून नेहेमीच घरचंच, दारच नाहीच असं हे आधुनिक संत सांगतात आणि त्यात तथ्यही असावं. दुसऱ्याच्या मनातली इच्छा, नजर ई. वाईटच. हे झालं उपहारगृहात जाऊन खाण्या बद्दल. पण मिठाया काचेच्या कपाटात ठेवल्या असतात, पाणी पुरी वाला देखील काचेचच छोटं कपाट वापरतो, भाजी / फळ तर उघड्यावरच ठेवलेली असतात, मॉल मधे पण सगळंच मांडलेलं, आणि असे अनेक अजून उदाहरणं देता येतील. किती ठिकाणी आणि काय काय टाळता येणार, अशक्य आहे. मग ह्यावर काय उपाय / तरणोपाय? भाजी फळ, किराणा ई. तर खावाच लागत. व्यवसाय म्हटला कि दुकान हे रस्त्यावरच असणार, मग प्रत्येक येण्या जाणाऱ्यांची त्यावर नजर पडणारच. आजकाल अनेक जण घरीच सगळ्या भाज्या लावतात, पण प्रत्येकाला पैशाने, आवडीने, वेळेमुळे हे जमणं थोडं अवघड आहे. असो. यूट्यूब चा, आपल्या अनुभवाचा उपयोग करून जमेल तेवढं घरीच करण्याचा प्रयन्त करू यात, बाकी "ठेविले अनंते तैसेचि राहावे चित्ती असू द्यावे समाधान". 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...