शनिवार, २० फेब्रुवारी, २०२१

उंगली में अंगूठी अंगूठी में नगीना...

तर आज ह्या माझ्या संख्या अंगठी बद्दल बोलावसं वाटतंय थोडक्यात. 


अगदी शाळेतली गोष्ट आहे, असेल ८-९ वी तली. माझ्या आई ला नेहेमी वाटायचं कि मी गळ्यात एक अगदी छोटी साखळी घालावी आणि बोटात एक छोटेखानी अंगठी.  पण मी काही ऐकत नसे अजिबातच. अर्थात तिने घेऊन ठेवलं होत सगळं पण मी कधीच ते अंगाला नाही लावलं. शेवटी एकदा म्हणते कशी, तुला कशी अंगठी हवी आहे ते सांग, आपण घेऊ. त्यावेळी मला कुठलाही उंचवटा, खडा ई. असलेली अंगठी नको होती. साधी गोल वाल्यासारखी पण त्यावर नक्षीकाम केलेली. पडत्या फळाची आज्ञा आणि तिने तशीच अंगठी घेऊन दिली मला. कुठला तरी सण होता म्हणून मी ती घातली आणि आईला मदत गरम भजे तळत असतांना पाहिलं तर बोटातली अंगठी गायब. बाप रे, पहिल्यांदा घातलेली. देवा.  पण मिळाली थोड्यावेळानी पिठात पडली होती. त्या दिवसापासून काढून ठेवली, किंबहुना थोड्याच वेळा करता घातली होती मी. खैर, त्यानंतर लग्नात घातली अंगठी, अनेक वर्ष मिरवली, बाळंतपणात बोट सुजल्यामुळे आणि त्यानंतर दोन मुलांना लागू नये म्हणून अंगठी, घडयाळ, बांगड्या, सगळं कपाटाचं धन झालं ते ४ वर्षा करता. मग पुन्हा "मन उधाण वाऱ्याचे.." असं काहीसं झालं, नवीन घराच्या शेजारी एकीची सवय बघून उत्साह आला. ती एका हातात, पाच अंगठ्या घालते अशी माझी चुकीची समजूत होती, कारण ती म्हणे १० अंगठ्या घालत होती एक हातात. प्रचंड शौक तिला, अर्थात सोनाराची मुलगी होती म्हणूनही असेल कदाचित. मग मी पण सणासुदीचं, कुठे कार्यक्रमाला जातांना अनेक अंगठ्या घालायला लागले, आवडायचं मला. मग पुन्हा काही दिवस ओसरले, आणि मी एकाच अंगठीवर आले, तीही परवा रात्री काढून ठेवली कारण अचानक काही दिवसांपासून डावा हात दुखायला लागला, अंगठी काढली आणि छान झोप लागली. काय संबंध कोणास ठाऊक. प्रत्येक रंगाच्या, आकाराच्या, प्रकारच्या अंगठ्या आहेत पण आता बास. खूप झाली हौस. बघू नंतर.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...