शुक्रवार, १९ फेब्रुवारी, २०२१

एक भलताच अनुभव...

काल मी फिजिओ थेरपी घेण्यास गेले होते. मी थोडीशी वेळेआधी पोचले त्यामुळे मी बसले होते. अजुन एक पेशंट आल्या माझ्या नंतर, त्यांनीही एक खुर्ची घेतली बसायला. त्यामुळे आता फक्त एकच खुर्ची उरली होती समोरच्या खोली मधे. आत असतात अजून खुर्च्या लागल्यातर. त्यानंतर एक तरुण मुलगा असेल तिशीतला आला आपल्या आईला घेऊन. आईला थोडासा चालायला त्रास होत होता. त्यामुळे त्या थोड्या मागे राहिल्या. हा त्यांचा मुलगा पहिले आत आला. आणि जसं कि कधीच खुर्ची पहिली नाही असा
फदकींनी बसला, देवा, म्हणजे आम्ही बघतच राहिलो. आणि त्यानंतर त्या काकू हळू हळू धरून आत आल्या आणि बघतात तर काय बसायला जागाच नाही. मग मी उठून त्यांना माझी खुर्ची दिली. कारण ऐवी तैंवी मला आत जायचंच होत आणि तेवढ्यातच कम्पाउंडर ने आतून आणलीच खुर्ची म्हणावं, पण हे काय अजीब वागणं. जगावेगळं.  आधी आपल्या आईला बसायला द्यायचं कि आपण बसायचं. आणि हद्द म्हणजे आई वाट पहाते आहे, मी उठली आहे तरी देखील हा शहाणा बसलाय. सॉरी पण हे काही पटण्या
सारखं नव्हतंच. जाऊ दे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...