शनिवार, २० फेब्रुवारी, २०२१

कांद्याची आमटी - Simple Cooked Dal with Onion


माझ्या आईकडे कांद्याशी आमचं नातं जरा दुरावलेलंच होत. अनेक उपवास असायचे आणि मुख्य म्हणजे माझ्या आईच एक तत्व होत, प्रत्येक भाजीची एक विशेष चव असते, ती टिकवावी, उगाचच काही भर घालून बदलू नये.  ह्या मुळे आमच्या कडे संमिश्र भाजी क्वचितच होत असे. कधीतरी वापरला जायचा हा कांदा, माझ्या राज्यात मी सुरु केलं होत, कारण जे पदार्थ मी करत असे त्यात कांदा, वाटण ई. सहज टाकलं जात होत. असो. तर अश्या ह्या कांद्याची आमटी माझी आई कधी कधी करत असे. आणि तिच्या हाताला आधीच भन्नाट चव, त्यात दुर्लभ / दुर्मिळ अशी ती आमटी म्हणजे अहाहा. मला शब्दच सुचत नाही आहेत तिच्या बद्दल लिहायला. तर अशी ती मला मनापासून आवडणारी आमटीच मला आज खायची होती, बास मग काय विचारात, रात्रीच थोडीफार तय्यारी करून ठेवली आणि आज डब्यासाठी केली देखील. त्यात, "चेरी ऑन केक" "आज मै उपर आसमा नीचे..." असं सगळं झालं माझ्या सोबत, कारण? डब्ब्यात भरल्यावर देखील ४ घास जास्त झाले भात आणि आमटीचे, हो, त्याच माझ्या चहित्या आमटीचे. गरमा गरम तूप घालून ते जेव्हा मी प्राशन केलं त्या वेळी मी माझीच नाही राहिले, जबरदस्त, अगदी आईच्या जवळपास ची चव होती. आणि दुपारी पुन्हा एकदा मी अख्खा डब्बा फस्त करणार आहे, जे बात. अजून काय हवंय, का$$$ही नाही. ते आजकाल सगळीकडे येत न "हॅप्पीनेस इज......." माझ्या साठी "हॅप्पीनेस इज एका दिवसात दोनदा पोटभर कांद्याची आमटी भात खायला मिळणे".

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...