शनिवार, २० फेब्रुवारी, २०२१

अद्भुत पर्वणी

आजचा दिवस हा अतिशयच भन्नाट सुरु झाला आहे. का म्हणताय? ओह हो हो, विचारूच नका. "मी आणि माझा बस स्टॉप" हे पर्व आता पुन्हा नव्या रूपात सुरु झालं आहे, ह्या नवीन दिवसांमधे. तर आज सकाळी सकाळी बस स्टॉप वर उभी असतांना मला सहजच बऱ्याच चकचकीत गाड्या दिसल्या आणि बहुतेक त्यात गाडीवान / ड्रायव्हर चालवत होता आणि मालक मागे बसले होते. एका गाडीत बहुतेक बाबा असावा चालक आणि मुलगा अभ्यासाचं पुस्तक वाचत होता. म्हटलं अहाहा किती छान न, ड्रायव्हर चालवतो आहे, आणि मागे बसून बिनधास्त जे हवं ते जसे कि वर्तमानपत्र, किंवा एखाद पुस्तक वगैरे चाळावं, काय भन्नाट अनुभव असेल नाही. असं फक्त मनात यायची देरी आणि माझी बस आली. बसल्या बसल्या बघते तर काय नवा कोरा करकरीत पेपर आमच्या बस काकांनी आणला होता. बास मग काय, ठेवली माझी बॅग बाजूला, काकांना मागितला पेपर आणि मनापासून वाचला, सकाळचे वर्तमानपत्र सकाळी वाचता येणं ह्या शिवाय अजून काय हवंय, कधी मी ऑफिस ला पोचले कळले देखील नाही. क्या बात है? फारच मज्जा आली. माझ्या साठी हि फारच मोठी अद्भुत पर्वणी आहे. आणि "दुधात साखर" म्हणजे तो पेपर चक्क माझ्या नागपूरचा हो, म्हणजे लोकमत. मग काय वर्धा रोड वरच्या लोकमत च्या इमारतीला मी फेरफटका मारून आले देखील. जबरदस्त च. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...